• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खोल धबधब्यातून निघालं धक्कादायक सत्य, NDRFच्या टीमने हात टेकले, पण 15 दिवसानंतर जे काही दिसलं त्याने…

March 12, 2026 by admin Leave a Comment


मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 16 वर्षांच्या मुलाचा मृतदेह अखेर देवलहा धबधब्याच्या पाण्यात तरंगताना आढळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की ही आत्महत्या नसून प्रेमप्रकरणातून घडवून आणलेली हत्या आहे. पोलिसांच्या कामकाजावर नाराज झालेल्या ग्रामस्थांनी काही तास रस्ता रोको आंदोलन केले, त्यानंतर प्रशासनाला स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळावी लागली.

24 फेब्रुवारी रोजी 16 वर्षीय विवेक विश्वकर्मा आपल्या भावाला बोलावण्यासाठी अष्टभुजी येथे गेला होता. मात्र त्या दिवशी बाहेर पजला, तो कधीच घरी परतला नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे, घरातून निघण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअॅपवर “Miss You” असं शेवटचं स्टेटस ठेवलं होतं. त्याचा कुठेचा पत्ता लागला नाही, पण धबधब्याजवळ त्याची सायकल आणि मोबाईल सापडले होते, त्याचा कुठेच मागमूस नव्हता. ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

देवलहा धबधब्यातून जे सापडलं.

अखेर त्या धबधब्याजवळ शोध घेण्यासाठी बनारसहून NDRF ची टीम घटनास्थळी बोलावण्यात आली होती. मात्र खोल दऱ्या आणि पाण्यामुळे विवेकचा काहीच पत्ता लागला नाही. शोधमोहीम राबवूनही टीमला यश आले नाही आणि अथक प्रयत्नांनतर सगळी टीम रिकाम्या हाताने परतली. तरीही कुटुंबीयांची आशा मात्र संपली नव्हती. घटनेनंतर जवळपास 15 दिवसांनी देवलहा धबधब्याच्या पाण्यात विवेकचा मृतदेह तरंगताना आढळला. ही बातमी समोर येताच संपूर्ण गाव हादरलं.

मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन

घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी विवेकचा मृतदेह लालगंज मोड येथे रस्त्यावर ठेवून रस्ता बंद करून जोरदार आंदोलन केले. प्रयागराजहून मऊगंजकडे जाणारा मुख्य रस्ता अनेक तास पूर्णपणे बंद होता.  या आंदोलनात मऊगंज काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच विश्वकर्मा समाजातील अनेक लोक सहभागी झाले होते. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते, मात्र नंतर त्यांना सोडून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

कुटुंबीयांचे गंभीर आरोप

कुटुंबीयांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. बराच वेळ समजूत काढल्यानंतर संध्याकाळी उशिरा कुटुंबीय पोस्टमार्टमसाठी तयार झाले. त्यानंतर आशीर्वाद हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समधून मृतदेह रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला.

अखेरर 24 तासांच्या आत कारवाई करू असे आश्वासन कलेक्टरने दिले आहे. तसेच पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे सांगितले आहे. विवेकच्या मृत्यूमागचे खरे कारण काय हे आता पोस्टमार्टम अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून समोर येऊ शकतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in