• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खोल दऱ्या, वाहणारे धबधबे, गुवाहाटीपासून खूपच जवळ आहे हे प्रसिद्ध ठिकाण! सौंदर्य असं की परत येऊ वाटणार नाही

January 27, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि रोमांचक सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर मेघालयमधील एक अप्रतिम हिल स्टेशन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

गुवाहाटीपासून अवघ्या 4 तासांच्या अंतरावर वसलेलं मौसिनराम हिल स्टेशन हे ठिकाण सौंदर्य, शांतता आणि साहस यांचा अनोखा संगम आहे. हे हिल स्टेशन गुवाहाटीपासून सुमारे 152 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मौसिनरामचं नाव तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्कीच असायला हवं.

मौसिनरामची ओळख ही भारतामधील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून आहे. येथे वर्षभर दमदार पाऊस पडतो. त्यामुळे हिरवीगार डोंगररांग, धबधबे, दऱ्या आणि ढगांनी वेढलेलं वातावरण पाहायला मिळतं.

येथील डोंगराळ भागातून जाणारे वळणावळणाचे रस्ते प्रवाशांना एक अद्भुत आणि रोमांचक अनुभव देतात. गाडी चालवताना आजूबाजूच्या खोल दऱ्या, धुक्याची चादर आणि सतत बदलणारे निसर्गदृश्य मन मोहून टाकते.

तेथील शांतता, शुद्ध हवा आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळतं. गर्दीपासून दूर, निवांत सुट्टी घालवायची असेल तर हे हिल स्टेशन आदर्श मानलं जातं. पावसाळ्यात तर येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य
  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in