• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा खोपा..; ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वाने घेतलं अंशुमनसाठी खास उखाणं

March 10, 2026 by admin Leave a Comment


‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ईशाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेचा नुकताच धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. ‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेल्या अंशुमन जोशीशी तिने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपूर्वा आणि अंशुमनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच अपूर्वाच्या एका खास व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये ती अंशुमनसोबत लग्नाच्या दागिन्यांच्या आणि कपड्यांच्या खरेदीसाठी एका दुकानात बसलेली पहायला मिळतेय. खरेदी करतानाच ती अंशुमनच्या नावाचं एक उखाणसुद्धा घेते.

या व्हिडीओच्या सुरुवातीलाच अपूर्वा उखाणं घेताना दिसतेय. “खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा खोपा.. अंशुमनरावांशी लग्न करून आयुष्याचा प्रवास झाला सोपा,” असं उखाणं घेताच अंशुमनसह दुकानात उपस्थित असलेले इतरही तिची वाहवा करतात. त्यानंतर ती विविध दागिने घालून बघते आणि त्यात अंशुमनसुद्धा तिची साथ देतो. या दोघांची जोडी खूपच सुंदर असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

अपूर्वाने अंशुमनसाठी घेतलेलं उखाणं-

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandrakalm Jewellery (@chandrakalm_jewellery)

अपूर्वा आणि अंशुमन यांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला होता. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अपूर्वाने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. परंतु या फोटोंमध्ये अंशुमनचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. अपूर्वाचा होणारा जोडीदार आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यातच सोशल मीडियावर काहींनी अंशुमनच्या नावाची चर्चा केली. त्यानंतर अपूर्वाने त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले.

‘माझं प्रेम.. या विश्वाने काहीतरी घडण्यासाठी कट रचला होता, असं जेव्हा लोक म्हणायचे, तेव्हा त्याचा नेमका काय अर्थ होतो, हे मला आता कळतंय. आपण एकमेकांसाठी बनलेलो होतो, पूर्णपणे तयार झालो होतो, तेव्हाच आपली एकमेकांशी भेट झाली होती. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझ्यावर आणखी प्रेम करायचं आहे’, अशा शब्दांत अपूर्वाने तिचं प्रेम व्यक्त केलं. ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तिने अंशुमनसाठी ही खास पोस्ट लिहिली होती.

अंशुमन 2011 मध्ये ‘शाळा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला होता. नंतर त्याने 2023 मध्ये ‘थानकम’ या मल्याळम चित्रपटात भूमिका साकारली. या चित्रपटात त्याने अंशुमन जोशी नावाच्याच मराठी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. अंशुमनचा जन्म कोल्हापुरात झाला असून तो सध्या पुणे शहरात राहतो.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in