• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा 5 वा मराठी चित्रपट; विक्रमापासून फक्त 61 लाख दूर

January 30, 2026 by admin Leave a Comment


सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम आणि हरिश दुधाडे यांच्या भूमिका असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात असूनही प्रजासत्ताक दिनी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. ‘बॉर्डर 2’सारखा मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असतानाही ‘क्रांतिज्योती विद्यालय’ने 35 लाख रुपये कमावले होते. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, विशेष म्हणजे या सर्व गोष्टींसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या प्रत्येकाकडून प्रयत्न व्हायला हवेत, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला आठवडा- 6.14 कोटी रुपये
दुसरा आठवडा- 8.76 कोटी रुपये
तिसरा आठवडा- 5.59 कोटी रुपये
23 वा दिवस- 26 लाख रुपये
24 वा दिवस- 65 लाख रुपये
25 वा दिवस- 88 लाख रुपये
26 वा दिवस- 98 लाख रुपये
27 वा दिवस- 35 लाख रुपये
एकूण कमाई- 23.61 कोटी रुपये

दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ या चित्रपटाला मागे टाकण्यासाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय’ला फक्त 61 लाखांची गरज आहे. हा आकडा पार केल्यास हेमंत ढोमेचा हा चित्रपट कोविडनंतरचा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा मराठी चित्रपट ठरेल. ‘क्रांतिज्योती विद्यालय’ या चित्रपटा लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं असून या चित्रपटाचा बजेट जवळपास साडेसहा कोटी रुपये आहे.

कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारे 5 मराठी चित्रपट

बाईपण भारी देवा- 76.28 कोटी रुपये
वेड- 61.2 कोटी रुपये
पावनखिंड- 37.72 कोटी रुपये
धर्मवीर- 24.67 कोटी रुपये
दशावतार- 24.21 कोटी रुपये

सचिन खेडेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, चिन्मयी सुमित, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारल्या आहेत. चित्रपटाचा मूळ विषय अत्यंत चोख मांडण्यात आला आहे. हेमंत ढोमेनं रंजक पद्धतीने विषयाचं गांभीर्य जाणवून दिलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
  • Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार
  • फक्त 10 रुपये खर्च, घरातील मच्छरांचा लगेच होतो नायनाट, वाचा काय ट्रिक वापरायची?
  • Liquor Price : दारू महागली, आता 1000 रुपयांची बॉटल किती रुपयांना मिळणार?
  • तब्बूचं वडिलांसोबत वैर… बापाचं नावही लावत नाही आणि भेटण्याची इच्छा नाही… अभिनेत्रीने सांगितंल हैराण करणारं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in