• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?

April 10, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिकेत भाजपसह महायुतीची सत्ता आल्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) विकासनिधी वाटपावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेतील विकासनिधीवरुन सध्या मुंबईच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातून ८०० कोटी रुपयांचा विशेष निधी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीच्या वाटपात महायुतीला म्हणजे भाजप-शिवसेनेतील नगरसेवकांना झुकतं माप दिल्याचा आणि विरोधकांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे.

निधी वाटपाचा लेखाजोखा

स्थायी समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, निधीच्या वाटपात प्रचंड तफावत दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी २ कोटी ते २.२५ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला जात आहे. काही महत्त्वाच्या नेत्यांना तर १० ते २० कोटींपर्यंत निधी मिळाला आहे. मात्र ठाकरे गटाच्या सर्वसामान्य नगरसेवकांच्या वाट्याला केवळ २५ लाख रुपयांचा तुटपुंजा निधी आला आहे. तसेच मनसे आणि एमआयएमच्या नगरसेवकांनाही केवळ २५ लाखांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सध्या नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या निधी वाटपावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. “हा जनतेचा पैसा आहे आणि तो विकासासाठी वापरला गेला पाहिजे. पण सध्या महापालिकेत केवळ सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना निधीची खिरापत वाटली जात आहे. विरोधकांच्या प्रभागात जनता राहत नाही का? हा लोकशाहीचा अपमान आहे. आम्हाला २५ लाख रुपये भीक म्हणून देताय काय? आम्हीच तुम्हाला २५ लाख देऊ, पण मुंबईच्या जनतेचा हक्क हिरावून घेऊ नका,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

तर दुसरीकडे भाजपने या आरोपांचे खंडन केले आहे. निधीचे वाटप हे नगरसेवकांनी सादर केलेल्या पत्रांनुसार आणि प्रस्तावित कामांच्या स्वरूपानुसार करण्यात आले आहे. यापूर्वी जेव्हा ठाकरे गटाची सत्ता होती, तेव्हा त्यांनीही अशाच प्रकारे वाटप केले होते. आम्ही केवळ जुनीच पद्धत पुढे नेत आहोत, असे स्पष्टीकरण सत्ताधारी नेत्यांनी दिले आहे. दरमयान मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच निधी वाटपावरून इतका मोठा भेदभाव होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?
  • Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?
  • Supriya Sule : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं खापर सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं?
  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in