• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणत्या देवाला कोणते फूल अर्पण करावे? जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगतं?

February 7, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मात दररोज सकाळी उठून  देवांची मनोभावे पूजा केली जाते. पूजेदरम्यान फुले अर्पण करणे ही केवळ एक परंपरा नाही, तर देवाप्रती असलेलेली आपली श्रद्धा आहे. फुले श्रद्धा आणि  पवित्रतेचे प्रतीक मानली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक देवतेला एक विशिष्ट फुल प्रिय असते.  शास्त्र आणि पुराणांनुसार चुकीची फुले अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊया कोणत्या देवाला कोणती फुले अर्पण करावीत.

भगवान शिव आणि माता पार्वती

देवांचे देव महादेवांना साधेपणा आवडतो. धार्मिक ग्रंथांमधील तज्ज्ञांच्या मते भगवान शिव यांना धतुऱ्याचे फुलं, हरसिंगार, नागकेसर आणि पांढरी फुले विशेषतः खूप आवडतात. त्याच बरोबर हे लक्षात ठेवा की केतकीच फुलं कधीही भगवान शिवांना अर्पण करू नयेत. दरम्यान, पार्वती मातेला लाल गुलाब किंवा जास्वंदाची फुले खूप आवडतात. तर पूजेदरम्यान तुम्ही ही फुलं अर्पण करू शकतात.

भगवान श्री गणेश आणि भगवान विष्णू

गणपती बाप्पाला लाल आणि पिवळी फुले खूप आवडतात. तर तुम्ही पूजदरम्यान गणपतीच्या मुर्तीला जास्वंद किंवा झेंडूच्या फुलांसह दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे. असे विद्वानांचे म्हणणे आहे. मात्र त्यांना कधीही तुळस अर्पण करू नये. भगवान विष्णू यांना कमळ, झेंडू आणि चमेली अशी पिवळ्या रंगांची फुलं खूप प्रिय आहेत. तसेच भगवान विष्णू यांना तुळशीची पाने अर्पण केल्याने ते त्वरित प्रसन्न होतात. तर पूजेदरम्याने तुम्ही गणपती बाप्पाला आणि भगवान विष्णू यांना त्यांची आवडती फुलं अर्पण करा.

लक्ष्मी माता आणि सरस्वती माता

धनाची देवी लक्ष्मी देवीला कमळाचे फूल सर्वात जास्त आवडते. लाल गुलाबही देवीला अर्पण करता येतात. पौराणिक कथेनुसार विद्याची देवी सरस्वती देवीला पांढरी किंवा पिवळी फुले अर्पण करावीत, कारण हे रंग शांती आणि बुद्धीचे प्रतीक आहेत.

फुले अर्पण करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम

धार्मिक दिनदर्शिका आणि रीतिरिवाजांनुसार पूजेसाठी फुले नेहमी सकाळी तोडावीत. जमिनीवर पडलेली किंवा आदल्या दिवशीची तोडून ठेवलेली फुलं कधीही देवाला अर्पण करू नका. शिवाय फुलं कोणत्या खराब डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता टोपली किंवा स्वच्छ भांड्यात ठेवावीत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर
  • सोन्यापेक्षाही महाग! तुमच्या स्वयंपाकघरातील या मसाल्याची किंमत माहित आहे का?
  • कठोर व्यायाम करताय तरीही वजन नाही होतेय कमी? त्यामागे असू शकतं ‘हे’ मोठं कारण
  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in