• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत पपईची पाने आणि बिया, जाणून घ्या त्याचे आयुर्वेदीक फायदे

February 13, 2026 by admin Leave a Comment


आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतो. त्यासोबत आरोग्यदायी फळांचा देखील सेवन करतो. आरोग्याच्या बाबतीत योग्य फळांचा विचार केला तर पपई सर्वात उत्तम फळ आहे. कारण पपई फक्त एक साधे फळ नाही तर एक नैसर्गिक औषध आहे जे शरीराला आतून बरे करते. आयुर्वेदात तर पपईला “अमृतफळ” असे म्हणतात कारण पपईचा प्रत्येक भाग जसे की पपईची पाने आणि बिया चमत्कारिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. प्रत्येक फळाचे स्वतःचे वेगळे गुणधर्म आहेत आणि पपई हे असे एक फळ आहे ज्यामध्ये तापावर उपचार करण्याची, रक्त शुद्ध करण्याची आणि त्वचा सुधारण्याची शक्ती आहे. पपई आणि त्याची पाने इतकी पॉवरफुल आहेत की ते शरीरातील तिन्ही दोष संतुलित करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. चला तर तर आयुर्वेदात अमृत असलेल्या पपईच्या पानांचे व बियांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

पपईचे पोषक घटक आणि फायदे

पपई हे सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारे फळ आहे आणि त्यातील पपेन एंझाइम पोट आणि आतड्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच पपई खाल्ल्याने पचन सुधारण्यात, शरीर शुद्ध करण्यात आणि पोषक तत्वे शोषण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

पाने आणि बिया कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत

केवळ पपईच नाही तर त्याची पाने आणि बिया देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि आयुर्वेदात औषध म्हणून पपईच्या पानांचा आणि बियांचा वापर केला जातो. पाने आणि बियांना थोडीशी कडू चव असली तरी ते शरीराच्या मुळाशी असलेल्या अनेक समस्या बरे करण्यास मदत करतात.

त्वचेशी संबंधित समस्यांसाठी पपईचे फायदे

जर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असतील तर पपईचे सेवन आणि लावणे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहे.

यासाठी पपईच्या गरामध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

हे तूमच्या त्वचा घट्ट करण्यास आणि डागांपासून मुक्त होण्यास मदत करते.

पपईच्या या फेसपॅकच्या नियमित वापराने त्वचेवर एक वेगळीच चमक येते.

ताप बरा करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी प्रभावी

तुम्हाला जर तापामुळे अशक्तपणा जाणवत असेल, रक्तातील अशुद्धता वाढली असेल किंवा प्लेटलेट्स कमी झाले असतील तर पपईची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिणे फायदेशीर ठरते.

पानांपासून बनवलेला काढा रक्त शुद्ध करतो आणि अनेक आजार कमी करण्यास मदत करतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास गुणकारी पपई

ताप किंवा संसर्गानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास, दररोज पपई खाणे फायदेशीर आहे. कारण पपईतील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पपईच्या पानांचा रस देखील पिऊ शकता.

केस गळतीच्या समस्येवर फायदेशीर

केस गळणे किंवा कमकुवत केसांसाठी पपईच्या बियांची पेस्ट केसांना लावल्याने केस मजबूत बनवते आणि कोरडेपणा कमी करते. आठवड्यातून एकदा बियांची पेस्ट लावण्याची शिफारस केली जाते.

मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम

आजकाल मासिक पाळीच्या वेदना खूप सामान्य झाल्या आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे ते वाढू शकते. तर या समस्यापासून सुटका मिळावी यासाठी पपई सेवन करा. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि शरीराला आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in