• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

के-ड्रामा थीम अन् विजयचा गंगनम स्टाइल डान्स; रश्मिका मंदानाच्या लग्नात काय काय झालं?

February 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्नबंधनात अडकले. उदयपूरमध्ये धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. आधी तेलुगू आणि त्यानंतर कोडाव विवाहपद्धतीनुसार विधी पार पडले. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खास होती. रश्मिका आणि विजय यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन थीम निश्चित करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी रोजी रश्मिका-विजयचा हळदीचा कार्यक्रमा पार पडला होता. दोघांनी इन्स्टा स्टोरीवर त्याचे काही फोटो पोस्ट केले होते. हळदीच्या कार्यक्रमाच्या डेकोरेशनमध्ये होळीची थीम पहायला मिळाली. तर प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये के-ड्रामा थीम पहायला मिळाली.

रश्मिकाच्या सर्व चाहत्यांना ही गोष्ट माहितच असेल की तिला ‘अॅनिमे’ आणि ‘के-ड्रामा’ किती आवडतात. कोरियन पॉप कल्चर आणि त्यांचे ड्रामा रश्मिकाला खूप आवडतात. त्यामुळे प्री-वेडिंग फंक्शनमधील केकसुद्धा के-ड्रामा थीमचा होता. या सर्वांत विजयचा सरप्राइज डान्स कार्यक्रमाचा हायलाइट होता. विजयने रश्मिकासाठी खास PSY या के-पॉप स्टारचा गंग्नम स्टाइल डान्स केला होता. त्यानंतर अंताक्षरी खेळण्यात आली होती. परंतु या अंताक्षरीचा नियम हटके होता. यामध्ये बॉलिवूड किंवा इतर कोणत्याही गाण्यांऐवजी फक्त विजय आणि रश्मिकाच्या चित्रपटांमधील गाणी गायची होती. पाहुण्यांमध्ये दोन गट पाडण्यात आले आणि जिंकणाऱ्या टीमला लग्जरी गिफ्ट हँपर देण्यात आला.

लग्नसोहळा पार पडल्यानंतर रश्मिका मंदानाच्या टीमकडून पापाराझींना मिठाई देण्यात आली. विवाहस्थळाबाहेर जी कोणी लहान मुलं उभी होती, त्यांच्यातही मिठाई वाटण्यात आली होती. विजय आणि रश्मिकाच्या टीमने सर्वांचे मनापासून आभार मानले. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिकाची मंडपमधील एण्ट्रीसुद्धा सर्वांत सुंदर आणि अनोखी होती. त्यासाठी पर्वतांची थीम बॅकग्राऊंडमध्ये होती. हे संपूर्ण दृश्य डोळ्यांत साठवण्यासारखं होतं. विजयसुद्धा रश्मिकाला नवरीच्या रुपात पाहून भावूक झाला होता. मंचावर जेव्हा दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं.

रश्मिका आणि विजय हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परंतु त्यांनी या रिलेशनशिपबद्दल कधीच खुलासा केला नव्हता. लग्नाच्या काही दिवस आधी विजय आणि रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in