• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केस गळतीने हैराण झाला आहात, रामदेव बाबांनी सांगितला स्वस्तातला उपाय

February 5, 2026 by admin Leave a Comment


पतंजलीचे संस्थापक आणि योग गुरु बाबा रामदेव यांनी केस गळतीवर घरगुती उपाय सांगितले आहेत. त्यांच्या मते केस गळती मागे आपल्या शरीरातील अनेक हेल्थ प्रॉब्लेम जबाबदार असू शकतात. किडनी वा लिव्हरचे आरोग्य जर कमजोर असेल तर याचे वाईट परिणाम आपल्या केस आणि त्वचेवर होत असतात. त्वचा निस्तेज होत असेल तर केस गळतीची समस्या सुरु होते. योगगुरु रामदेव बाबा यांच्या मते याच्या एलॉपॅथी नव्हे तर आयुर्वेदिक पद्धतीत योग्य उपचार होऊ शकतात. केस गळती रोखण्यासाठी अनेक घरगुती उपाय तुम्ही आजमावू शकता. या लेखात आपण स्वामी रामदेव यांनी केस गळतीवर कोणते आयुर्वेदिक उपायांचा माहिती दिली आहे.

खास बाब म्हणजे या घरगुती उपायांना आजमावणे एकदम सोपे आहे. आयुर्वेदिक उपाय असल्याने याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जे लोक
केस गळतीने जास्त त्रस्त आहेत.ते या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकतात.

केस का गळतात ? । Hair Fall reasons

कोणाचे केस जास्त गळत असतील तर या मागे महत्वाचे कारण तुमचा आहार आणि बिघडलेली लाईफस्टाईल असू शकते. ताण- तणावामुळे देखील केस गळू शकतात. दिवसभरात ५० ते १०० केसांची गळती होणे नॉर्मल आहे. परंतू याहून जास्त केस गळत असतील तर ही स्थिती काळजी करण्यासारखी नक्कीच असते. एक केस तीन टप्प्यातून जाते. पहिला टप्पा एनाजेल असून जो २ ते ७ वर्षांच्या दरम्यान होतो यास ग्रोथ फेज असे म्हटले जाते. दुसरा टप्पा वाढ थांबण्याचा ज्याला केटाजेन म्हणतात आणि त्याची वेळ २ ते ३ आठवडे आहे.शेवटचा टप्पा हा टेलोजेन असून यात केस गळतात आणि याची वेळ २ ते ३ महिन्यांची असते. जास्त केस गळण्याचा टप्पा टेलोजन फेज असतो. त्यात अचानक केस गळती वेगाने होते.

असे म्हटले जाते की हार्मोनल बॅलन्स योग्य नसल्याने केस गळतात. पुरुषात Dihydrotestosterone केसांची मुळे आखडतात. अशात केसांची मुळे कमजोर होतात आणि केस पातळही होतात. महिलांमध्ये मेनोपॉज, पीसीओएस आणि प्रेग्नंशीनंतर असे होते, परंतू रिकव्हरीही होते.पोषणाच्या कमतरतेनेही केस गळतात. केसांतील कॅरोटीन नामक प्रोटीन खूप गरजेचे असते. याची कमतरता सातत्याने होत असेल तर केस वेगाने गळू लागतात.

बाबा रामदेव यांचे उपाय आजमवा

योग गुरु सांगतात की जर तुम्ही केसांना नैसर्गिकरित्या हेल्दी ठेवू इच्छीता तर त्यासाठी नखांना आपआपसात घासा. केस गळतीसाठी शरीरात आयर्नची कमतरता देखील जबाबदार असते. त्यामुळेही केस कमजोर होतात. रामदेव बाबा यांनी सांगितले की शरीरात मायक्रोन्यूट्रिएंट्सची कमतरता असेल तरही केस गळती होते. रामदेव बाबा यांच्या मते योग्य प्रमाणात दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने देखील फायदा होतो. जर यात तुम्ही आवळा रस मिक्स केला तर केसांना दुप्पट फायदा होतो.

योगगुरु रामदेव बाबा म्हणतात की तुम्ही सकाळी दुधी भोपळ्याचा रस आणि आवळा ज्यूस पिऊ शकता. यात कोंथीबीर, पुदीना आणि लिंबूचा रस देखील मिक्स करु शकता. लिंबूत व्हिटामिन्स सी असते त्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते. रामदेव बाबा यांच्या मते ज्यांना एसिडीटीची समस्या आहे त्यांनी लिंबू रस मिक्स करु नये. केसांसाठी आवळ्याचे सेवन उत्तम मानले जाते. केसांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी आवळा कँडी, मुरब्बा वा थेट ज्यूस देखील पिऊ शकता. स्वस्तात मिळणाऱ्या या पदार्थांनी एक नव्हे तर अनेक फायदे होतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhishek Bachchan : ॲक्टिंग नव्हे, बिग बींच्या मुलाला निवडायचं होतं हे करिअर, अभिषेकने अचानक का बदलला निर्णय ?
  • कोळसा खाणीत भीषण स्फोट, 16 मजूर जागीच गाडले गेले; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
  • संधिवात झाल्यावर काय खावे, काय खाऊ नये, रामदेव बाबा यांनी सांगितलं काय काळजी घ्यावी?
  • Vastu Shastra : गरीबी दूर करणारं झाडं, आहेत खूपच चमत्कारीक फायदे
  • ना औषधं, ना महागाडी उत्पादने, फक्त रामदेव बाबांचे हे उपाय थंडीच्या दिवसांमध्ये सर्दीपासून तुमचं संरक्षण करतील

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in