• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केरळात भाजपाच्या उमेदवार होत्या सोनिया गांधी ? देशात झाली होती चर्चा, अखेर…

January 19, 2026 by admin Leave a Comment


केरळातील इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार पंचायत निवडणूकीत भाजपाची सोनिया गांधी नावाची उमेदवार चर्चेत आली होती. या नावामुळे या राज्यासह देशभरात या तरुणीची चर्चा सुरु होती. अनेकांना वाटेल की सोनिया गांधी यांचे नाव आणि भाजपाची उमेदवार कशी काय ? या मागे देखील एक कहाणी दडलेली आहे.स्थानिक निवडणूकात भाजपच्या या उमेदवाराला सोनिया गांधी यांच्या नावाचा काही फायदा होणार की तोटा याची सर्वत्र चर्चा सुरु होती. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावासारखे हुबेहुब नावाच्या भाजपाच्या उमेदवार असल्याने ही निवडणूक रंगतदार झाली होती..

मुन्नार ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत भाजपाच्या कार्यकर्त्या सोनिया गांधी यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपाचे नेतृत्व विरोधी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. त्यामुळे सोनिया गांधी नावाच्या उमेदवाराला भाजपाचे तिकीट कसे काय मिळाले याची चर्चा सुरु होती.यामागे या सोनिया गांधी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जबाबदार आहे.

Kerala BJP candidate Sonia Gandhi finally lost the panchayat election

Kerala BJP candidate Sonia Gandhi finally lost the panchayat election

वडील काँग्रेसमध्ये आणि पती भाजपात

सोनिया गांधी यांचे दिवंगत पिता दुरे राज हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते नल्लथानी कल्लार क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे सक्रीय चेहरा होते.या काँग्रेस नेत्याने सोनिया गांधी यांचा प्रती असलेला आदर आणि सन्मान दाखवण्यासाठी त्यांच्या नवजात कन्येचे नाव सोनिया गांधी असे ठेवले होते. परंतू जीवनाच्या प्रवाहात राजकारणात सतत बदलत असते. सोनिया हीचा राजकीय प्रवास देखील असाच झाला. सोनिया हीच्या विवाहानंतर तिने राजकीय दिशा बदलली. तिचे पती सुभाष भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. आता पंचायत समितीचे जनरल सेक्रेटरी देखील आहेत. दीड वर्षांपूर्वी मुन्नारच्या जुन्या मोलक्कडा वॉर्डातील उपनिवडणूकीत ते भाजपाचे उमेदवार देखील होते. पतीची राजकीय भूमिका पाहून हळूहळू तिनेही भाजपा जॉईंट केली. आता ती पक्षाच्या तिकीटावर पंचायत निवडणूकीच्या मैदानात उभ्या होत्या.

विरोधी उमेदवाराला आव्हान, परंतू….

युडीएफच्या विरोधी उमेदवार मंजुला रमेश यांच्यासाठी ही निवडणूक आता सामान्य राहिली नव्हती, कारण मतपत्रिकेवर “सोनिया गांधी (BJP)” हे नाव छापलेले पाहून अनेक मतदार बुचकळ्यात टाकले होते.. राजकारण अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. जेव्हा नावे सारखी असल्याने मतांची विभागणी झाली आहे. स्थानिक निवडणूकात हा फॅक्टर अधिक प्रभावी ठरण्याचा धोका असतो.मात्र, सोनिया गांधी हिला मुन्नार पंचायतीच्या १६ व्या वॉर्ड असलेल्या नल्लाथन्नी वॉर्डमधून निवडणूकीत केवल १०३ मते मिळाली, तिच्या विरोधात उभ्या असलेल्या युडीएफच्या उमेदवार मंजुला रमेश यांचा येथे विजय झाला.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in