• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुलदीप यादवची होणारी पत्नी आहे तरी कोण? जिच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला ‘चायनामॅन’ स्पिनर

March 13, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव वंशिका आहे. वंशिका ही मूळची कानपूरची आहे. तिच्या वडिलांचं नाव योगेंद्र सिंह चड्ढा असून जे एलआयसीमध्ये कार्यरत आहेत. तर वंशिका ऑस्ट्रेलियात नोकरी करत असून कामासाठी ती तिथेच राहते. वंशिकाने 2017 मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली. तिथेच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर तिथेच नोकरी करू लागली. कुलदीप आणि वंशिका हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. लहानपणापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. जसजसे ते मोठे झाले, तसतशी त्यांची मैत्रीत प्रेमात बदलली. आता लवकरच दोघं लग्नबंधनात अडकून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या 14 मार्च रोजी कुलदीप आणि वंशिका लग्नबंधनात अडकणार आहेत.

कुलदीप आणि वंशिका यांनी 4 जून 2025 रोजी लखनऊमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये साखरपुडा केला होता. आज (13 मार्च, 2026) या दोघांचा हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 14 मार्च रोजी लग्नसोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर 17 मार्च रोजी लखनऊच्या सेंट्रल हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. कुलदीप आणि वंशिका यांचं लग्न मसुरी इथं होणार आहे. हॉटेल सवायमध्ये जवळपास 80 पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल सवायशिवाय जेडब्ल्यू मेरिएट आणि फॉर्च्युन हॉटेलमध्येही पाहुण्यांसाठी रुम्स बुक करण्यात आले आहेत. या लग्नसोहळ्याला जवळपास 200 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kuldeep yadav 🇮🇳 (@kuldeep_18)

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नातील प्लेटची किंमत 6000 रुपयांपेक्षा अधिक आहे. हॉटेलकडून खास पहाडी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मडुवा रोटी, लाल तांदूळ, भात, घाटी डाळ, फणू, चानसू, कंदली साग, कुमाऊनी रायता, भांग चाट आणि झांगोरा खीर यांसारख्या पहाडी खाद्यपदार्थांचा समावेश असेल. तर नाश्यात इडली डोसा, छोले भटुरे आणि पोहे यांचा समावेश असेल. कुलदीप आणि वंशिका यांच्या लग्नसोहळ्याविषयी चाहते फार उत्सुक आहेत. अनेकांनी त्याच्या सोशल मीडियावर आतापासूनच शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in