• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुटुंबाला धक्का! या महिलेने मृत्यूपूर्वी 72 कोटींची संपत्ती केली बॉलिवूड अभिनेत्याच्या नावावर, कारण…

March 20, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Actor : बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल चाहत्यांमध्ये असलेले वेड कधी-कधी आश्चर्यचकित करणारे असते. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. अशाच एका धक्कादायक आणि भावनिक घटनेने काही वर्षांपूर्वी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, ज्यामध्ये एका महिला चाहत्याने आपली संपूर्ण मालमत्ता थेट अभिनेता संजय दत्तच्या नावावर केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठी या महिलेने 2018 साली निधनापूर्वी आपली सर्व मालमत्ता संजय दत्तच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. या मालमत्तेमध्ये सुमारे 10 कोटी रुपये किंमतीचे घर देखील समाविष्ट होते. निशी आपल्या आई आणि कुटुंबासोबत मुंबईत राहत होती आणि ती संजय दत्तची प्रचंड मोठी चाहती होती.

फोनवरून संजय दत्तला माहिती

विशेष म्हणजे, या घटनेबाबत संजय दत्तला काहीही माहिती नव्हती. तिच्या निधनानंतर पोलिसांनीच संजय दत्तला याची माहिती दिली. त्या वेळी संजय दत्त कोलकाता येथे एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. पोलिसांकडून फोनवर त्याला सांगण्यात आले की, 62 वर्षीय महिला निशी त्रिपाठी यांचे निधन झाले असून त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात सर्व मालमत्ता त्याच्या नावावर केली आहे.

ही माहिती ऐकून संजय दत्त पूर्णपणे स्तब्ध झाला होता. त्याने स्पष्टपणे सांगितले की तो त्या महिलेला ओळखतही नाहीत आणि त्यांची कधी भेटही झालेली नाही. “मी खूपच शॉक्ड आहे, माझ्याकडे शब्द नाहीत, अशी प्रतिक्रिया त्याने त्यावेळी दिली होती.

संजय दत्तचा मोठा निर्णय

दरम्यान, निशी त्रिपाठी यांच्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीयही तितकेच आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या निधनानंतर सापडलेल्या पत्रामध्ये त्यांनी आपल्या सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात त्यांनी नॉमिनी म्हणून संजय दत्तचे नाव आणि पत्ताही नमूद केला होता.

ही घटना समोर आल्यानंतर संजय दत्त भावूक झाला. मात्र, त्याने अत्यंत संवेदनशील भूमिका घेत निशी यांच्या मालमत्तेवर कोणताही दावा करण्यास नकार दिला. त्याने स्पष्ट सांगितले की ही मालमत्ता त्यांच्या कुटुंबालाच मिळायला हवी. संजय दत्तच्या वकिलांनी देखील याबाबत माहिती देताना सांगितले की, अभिनेत्याने निशी यांच्या कुटुंबाला मदत करण्याची तयारी दर्शवली. यासाठी त्याने बँकेलाही पत्र लिहून निशी यांच्या कुटुंबीयांनाच मालमत्ता मिळावी अशी भूमिका मांडली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in