• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुंभमेळ्यातील मोनालिसासोबत लव्ह जिहाद? मॅनेजरनेच केला सौदा; फरमान खानशी लग्नाबाबत धक्कादायक दावा

March 13, 2026 by admin Leave a Comment


कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले हिने मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खान याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियावर मोनालिसा हिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोनालिसा हिच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेत लग्न केलं. केरळ येथे मोनालिसा आणि फरमान यांनी हिंदू पद्धतीत लग्न केलं… मोनालिया हिने लग्न केल्यानंतर कुटुंबिय आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सनोज यांनी मोनालिसा हिचं लग्न नाही तर, लव जिहाद आहे…

सनोज मिश्रा यांचा दावा…

सनोज मिश्रा यांनी मोनालिसा हिच्यासोबत एक फोटो पोस्ट करत, फरफान याच्यासोबत लग्न फक्त लव जिहाद आहे. सनोज मिश्रा म्हणाले, ‘ही बंडखोरी नाही तर, लव जिहाद आहे आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा वाईट दिवस… मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण मी डिप्रेशनमध्ये आहे… कारण एक गरीब जंगली भागात राहणारी मुलगी कुंभमेळ्यात व्हायरल झाली आणि घाबरलेल्या अवस्थेत पळून गेली. तिची गंगेसारखी पवित्रता मला आवडली… मी तिला प्रशिक्षण देण्याची आणि माझ्या सिनेमात अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली आणि जगानं देखील तिचं स्वागत केलं. पण , आमच्या विरोधकांपैकी एक, वसीम रिझवी यांना हे आवडले नाही आणि त्यांनी मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. त्यांचा उद्देश माननीय योगी आदित्यनाथजी यांनी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रम महाकुंभमेळ्याला गालबोट लावणं होता.’

मोनालिसा हिची फसवणूक – सनोज मिश्रा

‘मी तुरुंगात राहून सिनेमाची कथा लिहिली, पण अनेक जण म्हणत होते, सनोज सिनेमा करूच शकणार नाही… माझ्यावर अनेक आरोप केले. पण आता काय करयाचं हे त्यांना कळत नाहीये.. सगळे फक्त एकमेकांच्या दारात लक्ष ठेवून असतात. आता, त्या सर्वांकडे एकच पर्याय होता: मोनालिसा, जिला मी गंगा मातेचा अवतार मानत होतो. मोनालिसाचं आयुष्य खूप कठीण होतं. तिची आई, मोठी आई, छोटी आई, वडील, मोठे वडील, छोटे वडील हे सर्व ढोंगी होते. तिचं आयुष्य तिच्या खऱ्या आईवर अवलंबून होतं, जिला वडिलांनी हाकलून दिलं होतं आणि दुसरं लग्न केलं होतं.’

सनोज पुढे म्हणतात, ‘बंजारा समाजाचे कायदे वेगळे असतात. त्यामुळे मोनालिसा हिला सावत्र आईला आई म्हणावं लागत होतं… पण मोनालिसा जेव्हा सेलिब्रिटी झाली तेव्हा तिची एखाद्या भिकाऱ्यांप्रमाणे माळा विकताना दिसायची, तेव्हा मोनालिसा प्रचंड रडायची… तिने अनेकदा माझ्याकडे दुःख देखील व्यक्त केलं. मी कायम तिची समज घातली. पण खासगी प्रकरणात हस्तक्षेप करणं मला योग्य वाटलं नाही.’

बंडखोरी नाही, लव जिहाद आहे मोनालिसा हिचं लग्न…

मोनालिसाच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत सनोज मिश्रा पुढे लिहितात, “मोनालिसाला कदाचित वाटेल की तिचं कृत्य तिच्या कुटुंबाविरुद्धचे बंड आहे. पण, हे पाऊल बंड नाही तर लव्ह जिहाद आहे, ज्याची ती आधीच बळी पडली आहे. यामध्ये तो बोगस शिक्षक देखील समाविष्ट आहे, ज्याला मी पैसे दिल्यानंतर मोनालिसाचा मॅनेजर बनला. मी त्याला मोनालिसाला शिक्षण देण्यासाठी निवडलं होतं, पण तो दलाल बनला आणि दक्षिण भारतात मोनालिसाचा सौदा करू लागला. त्याने हळूहळू मला बंजारा समुदायापासून दूर केलं, ज्याचे परिणाम आज स्पष्ट दिसत आहेत… सध्या सनोज यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in