• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किती कोटींची मालकीण आहे तेंडुलकरांची सून… सचिनच्या मुलाची संपत्ती किती? थक्क करणारा आकडा समोर

March 6, 2026 by admin Leave a Comment


Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अर्जुन याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नानंतर त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अर्जुन आणि सानिया यांच्या संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे… तर जाणून घ्या सचिन तेंडुलकर यांची सून किती कोटींची मालकीण आहे…
अर्जुन तेंडुलकर याची नेटवर्थ…

अर्जुन सध्या त्याच्या करियरची सुरुवात करत आहे. पण त्याची स्वतःची संपत्ती देखील काही कमी नाही… मुंबई इंडियन्ससोबतचा त्याचा करार प्रत्येक सिझन सुमारे 30-50 लाख रुपयांचा असण्याचा अंदाज आहे. रिपोर्टनुसार, अर्जुनची वैयक्तिक संपत्ती सुमारे 10-15 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. शिवाय, तो मुंबईतील वांद्रे येथील वडील सचिन यांच्या 100 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतो.

कोण आहे सानिया चंडोक?

अर्जुन याची पत्नी सानिया चंडोक कोणतं साध नाव नाही. सानिया भारतातील दिग्गज उद्योजक आणि ग्रेव्हिस ग्रुपचे (Graviss Group) अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. सानियाने परदेशात व्यवसाय आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे आणि ती तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय भूमिका बजावते, ज्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि लाइफस्टाइल ब्रँडचा समावेश आहे. सानियाच्या कुटुंबाने भारतात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बास्किन-रॉबिन्स लाँच केला.

सानिया चंडोक हिची नेटवर्थ…

सानिया एका अत्यंत प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातून येते. ग्रॅव्हिस ग्रुपचे व्यवसाय हॉस्पिटॅलिटी, अन्न आणि रिअल इस्टेटमध्ये पसरलेलं आहेत. जरी तिची नेमकी वैयक्तिक संपत्ती सार्वजनिकरित्या ज्ञात नाही, पण त्यांचा कौटुंबिक व्यवसाय लाखो कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सानियाला अर्जुनपेक्षा खूप मोठी कुटुंब संपत्ती वारशाने मिळाली आहे.

महागड्या गाड्या आणि आलिशान बंगले

तेंडुलकर कुटुंबाला नेहमीच आलिशान गाड्यांचा शौक राहिला आहे. अर्जुन अनेकदा आलिशान गाड्यांमध्ये दिसतो, ज्यामध्ये BMW i8, BMW X5 आणि Nissan GT-R सारख्या सुपरकार्सचा समावेश आहे. दरम्यान, सानिया मुंबईतील उच्च-प्रोफाइल व्यावसायिक वर्तुळाचा भाग आहे आणि ती खूप आलिशान जीवनशैली जगते.

कशी सुरु झाली अर्जुन – सानिया यांची लव्हस्टोरी?

अर्जुन आणि सानियाचे नातं बराच काळ गुप्त राहिलं. जवळच्या सूत्रांनुसार, दोघांची पहिली भेट मुंबईच्या सामाजिक वर्तुळातून झाली. त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री नात्यात बदलली आणि दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला मान्यता दिली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in