• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किडनीचा प्रत्येक आजार होईल बरा, बाबा रामदेव यांनी सांगितले हे प्रभावी घरगुती उपाय

February 7, 2026 by admin Leave a Comment


आजकाल किडनीमध्ये स्टोन होणे, किडनीला सूज येणे आणि किडनी डॅमेज होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. तर या समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे पाण्याचा अभाव, अस्वस्थ खाण्याच्या सवयी आणि जास्त लोहाचे प्रमाण या सर्वांमुळे किडनीच्या समस्या वाढू लागलेल्या आहेत. जर किडनीच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या गंभीर आजारात बदलू शकतात. किडनीच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपचार आणि औषधे बाजारात उपलब्ध असली तरी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने त्यावर उपचार करू शकता. ही आयुर्वेदिक पद्धत अत्यंत प्रभावी आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या शरीराला होत नाहीत.

आयुर्वेद तज्ञ बाबा रामदेव हे नेहमी सोशल मीडियाद्वारे लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपाय सांगत असतात. यावेळी बाबा रामदेव यांनी किडनीच्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी एक प्रभावी घरगूती उपाय सांगितला आहे, जे किडनीचे आरोग्य सुधारेल आणि आजार देखील बरे करेल. तर आजच्या लेखात आपण या घरगुती उपायाबद्दल जाणून घेऊयात.

बाबा रामदेव यांनी सांगितलेले घरगुती उपाय

बाबा रामदेव यांनी किडनी स्टोन आणि सुज यावर विविध घरगुती उपाय सुचवले आहेत, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या शरीरासाठी प्रभावी ठरतील. यामध्ये कडुनिंब, पिंपळाच्या पानांचा रस, कसनी (आयुर्वेदिक औषधी वनस्पती), सराटा (गोखरू,आयुर्वेदिक औषधी वनस्पती ) कोथिंबीर आणि पुदिना यासारख्या औषधी वनस्पतींचा रस बनवून प्यायल्याने किडनीचे आजार बरे होतात.

तर बाबा रामदेव यांच्या मते, जी लोक दररोज आहारात कोथिंबीर समावेश असतो त्यांची किडनी निरोगी राहते. खरं तर कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क, के आणि खनिजे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे किडनी योग्यरित्या कार्य करू शकते.

किडनी स्टोन रोखण्यासाठी प्रभावी मार्ग

एखाद्याला जर स्टोनची समस्या असेल तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही दररोज कुळीथाच्या डाळीचे सेवन करावे. कारण या डाळीत असलेले काही संयुगे किडनी स्टोन‍ विरघळवातात.

मधुमेही रूग्णांना किडनीची समस्या सतावत असेल तर हा रस प्यावा

बाबा रामदेव हे मधुमेही लोकांना कारल्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. कारण कारल्याचा रस प्यायल्याने पोट प्रभावीपणे साफ होते. शिवाय, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते. जर कारल्याचा रस प्यायल जात नाही तेव्हा त्यात टोमॅटो प्यूरी मिक्स करून प्यावे. रामदेव यांच्या मते, आठवड्यातून एकदा तरी कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले
  • ‘धुरंधर’संदर्भातील त्या रीलवर एका ‘लाईक’मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते
  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in