• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काय झालं, कसं झालं? काही कळेना..; रील स्टार प्रथमेश कदमच्या शेवटच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

January 26, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांचं मनोरंजन करणाऱ्या रील स्टार प्रथमेश कदम यांचं निधन झालं आहे. प्रथमेश याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, पती आणि त्यानंतर मुलाचं निधन झाल्यामुळे प्रथमेश याची आई पूर्णपणे कोलमडली आहे. प्रथमेश कायम आईसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायचा. आता प्रथमेश याची शेवटीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये प्रथमेश आनंदी आणि भन्नाट डान्स करताना दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रथमेश याने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आणि तोच व्हिडीओ प्रथमेश याचा शेवटचा व्हिडीओ ठरला आहे.

प्रथमेश कदम याची शेवटची पोस्ट

सांगायचं झालं तर, प्रथमेश कदम याने पोस्ट केलेला व्हिडीओ त्याच्या नव्या गाण्याचा होता. ‘भावाची हळद लागली…’ या गाण्याची  झलक प्रथमेश याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. व्हिडीओ पोस्ट करत प्रथमेश याने कॅप्शनमध्ये, ‘नवीन गाण पहिला की नाही…? लवकर जाऊन बघा….’ असं लिहिलं होतं. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh kadam (@_prathamesh_kadam)

 

आता याच व्हिडीओवर नेटकरी दुःख व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेश याला श्रद्धांजली वाहिली. तर अनेकांनी कसं झालं… काय झालं? असा प्रश्न देखील विचारला आहे. थमेशच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं असून आजारपणामुळे त्याने प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सांगायचं झालं तर, 2025 मध्ये प्रथमेश याने रुग्णालयातून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलेला, ज्यामध्ये प्रथमेश त्यांच्या आजारपणाबद्दल सांगताना दिसला. आजारपणातही रुग्णालयातून त्याने मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत लोकांचं मनोरंजन केलं होतं. नवीन वर्षात त्याचं नवीन गाणंसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर याची पोस्ट

सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर प्रथमेश याच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आणि जवळच्या मित्राला गमावल्यानंतर शोक व्यक्त केला. तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई… असं म्हणत तन्मय याने दुःख व्यक्त केलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : कोणत्या रक्तगटाच्या लोकांना सर्वात जास्त मच्छर चावतात?
  • T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
  • RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
  • Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
  • Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in