• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काय आहे पंतप्रधानांच्या काळ्या ब्रीफकेसचं रहस्य? बटन दाबताच होते लोखंडी भिंत; कोणती टेक्नॉलॉजी दडलीय त्यात?

February 1, 2026 by admin Leave a Comment


Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या जवळ कायम काही काळ्या सूटमध्ये, चष्मा घातलेले कमांडो दिसतात. या कमांडोंच्या हातात अनेकदा एक काळा ब्रीफकेसही पाहायला मिळतो. हा ब्रीफकेस नेमका काय आहे, याबाबत नागरिकांमध्ये नेहमीच कुतूहल आणि अनेक अफवा पसरलेल्या असतात. काही जण या ब्रीफकेसमध्ये अण्वस्त्रांचे कोड असतात, तर काहीजण गुप्त कागदपत्रांचा अंदाज लावतात. मात्र, प्रत्यक्षात या ब्रीफकेसचे काम पूर्णपणे वेगळे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या ब्रीफकेसचे तांत्रिक नाव ‘पोर्टेबल बॅलिस्टिक शिल्ड’ असे आहे. दिसायला हे साधे वाटत असले तरी गरज पडल्यास केवळ एका क्षणात ती मजबूत बुलेटप्रूफ भिंतीमध्ये रूपांतरित होते. कोणताही संभाव्य हल्ला झाल्यास पंतप्रधानांना तात्काळ संरक्षण देणे हाच या ब्रीफकेसचा मुख्य उद्देश आहे.

या पोर्टेबल बॅलिस्टिक शिल्डमध्ये वापरण्यात आलेली तंत्रज्ञान NIJ लेव्हल 3 सुरक्षा प्रदान करते. म्हणजेच, ही अटॅची एके-47सारख्या घातक रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांनाही थोपवू शकते. छोट्या दिसणाऱ्या या ब्रीफकेसमध्ये दडलेले तंत्रज्ञान अत्यंत प्रगत असून, हल्ल्याच्या सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये जीव वाचवण्यासाठी ती निर्णायक ठरू शकते.

फक्त संरक्षणच नाही तर या ब्रीफकेसमध्ये शस्त्रे आणि गॅजेट्सचा उत्तम समन्वय साधण्यात आला आहे. अहवालांनुसार, या शिल्डमध्ये एक गुप्त कप्पा असतो, ज्यामध्ये कमांडो पिस्तूल ठेवू शकतो. त्यामुळे ही बुलेटप्रूफ भिंत संरक्षणासोबतच प्रसंगी प्रतिआक्रमणासाठीही उपयोगी ठरते.

दरम्यान, इंटरनेटवर पसरलेल्या अफवांमध्ये या ब्रीफकेसमध्ये अण्वस्त्रांचे कोड असल्याचा दावा केला जातो. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही केवळ अफवाच आहे. पंतप्रधानांसोबत असणारा हा ब्रीफकेस कोणत्याही अण्वस्त्र प्रणालीशी संबंधित नसून तो पूर्णपणे वैयक्तिक सुरक्षेसाठी डिझाइन करण्यात आलेला आहे.

एका क्षणात घेते संरक्षण भिंतीसारखे रुप

या ब्रीफकेसच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेले साहित्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये केव्लर आणि अल्ट्रा-हाय मॉलिक्यूलर वेट पॉलीथिलीन या अत्यंत मजबूत पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. सॉफ्ट आर्मर आणि हार्ड आर्मर यांचे मिश्रण असलेल्या या शिल्डमध्ये अनेक स्तरांमध्ये विणलेले फायबर वापरले जातात जे गोळीबाराच्या धक्क्याला प्रभावीपणे शोषून घेतात.

या ब्रीफकेसची सर्वात खास बाब म्हणजे त्यातील ग्रॅव्हिटी-असिस्टेड डिप्लॉयमेंट सिस्टिम. म्हणजेच, ती तंत्रज्ञान ज्यामुळे हा ब्रीफकेस एका क्षणात बुलेटप्रूफ भिंतीत बदलते. यामध्ये असलेल्या क्विक-रिलीज लॅचला ओढताच गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने फोल्डिंग पॅनल्स खाली उघडतात आणि एका सेकंदाच्या आत ही अटॅची मजबूत संरक्षण भिंतीचे रूप घेते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in