• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काजूकतली वाटेल फिकी, अशा पद्धतीने बनवा शेंगदाणा बर्फी, रेसिपी एकदा पाहाच

April 10, 2026 by admin Leave a Comment


हलका गोडवा आणि मऊ टेक्सचरमुळे काजू कतली ही भारतातील सर्वात लोकप्रिय मिठाईंपैकी एक आहे. तर काजू हे या मिठाईचे मुख्य घटक आहे, ज्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण बनते. मात्र आजकाल बाजारात कोणतीच मिठाई शुद्ध आणि अस्सल असेल याची खात्री करता येत नाही. कधीकधी मिठाई बनण्याच्या सामानात भेसळ करतात. तुम्ही जर काजू कतलीचे चाहते असाल तर एकदा घरी शेंगदाणा बर्फी बनवून बघा. त्याची चव अगदी काजू कतलीसारखीच लागते.

शेंगदाणा बर्फी बनवायला फारशी अवघड नाहीये. तुम्ही ही बर्फी घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊयात.

शेंगदाणा बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

अर्धा किलो शेंगदाणे, 350 ग्रॅम साखर , पाकासाठी 22 मिली पाणी, थोडे केशर, अर्धा किलो खवा आणि थोडी वेलची पूड.

शेंगदाणा बर्फी बनवण्याची पद्धत:

  • सर्वात आधी तुम्हाला शेंगदाणे चांगले भाजून घ्यावे लागतील.
  • यासाठी मंद आचेवर शेंगदाणे सतत परतवत राहा, जेणेकरून कच्चेपणा निघून जाईल आणि शेंगदाणे जास्त भाजले जाणार नाहीत.
  • भाजलेले शेंगदाणे एका मोठ्या ताटात काढून घ्या आणि ते थंड झाल्यावर हलक्या हाताने त्यांची साल काढा.
  • तुम्ही शेंगदाणे एका स्वच्छ टॉवेलवर घासूनही त्यांची सालं काढू शकता.
  • सालं काढल्यानंतर शेंगदाणे बारीक पूड वाटून घ्या. जर तुम्हाला काजू कतलीसारखा पोत हवा असेल, तर त्याची पूड करा.
  • एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि मिश्रण चिकट होईपर्यंत पाक तयार करून घ्या.
  • पाकात केशराचे धागेही मिक्स करा. यामुळे बर्फीला चवीसोबतच एक अप्रतिम सुगंधही येईल.
  • जेव्हा पाक एकतारी घट्ट होईल, तेव्हा त्यात बारीक वेलची पूड आणि खवा मिक्‍स करा आणि हे मिश्रण सतत ढवळत राहा. खवा विरघळल्यावर त्यात 2 चमचे तूप टाका.
  • शेवटी शेंगदाण्याची पूड मिक्‍स करून चमच्याने चांगले मिसळा आणि 3 ते 4 मिनिटे शिजू द्या.
  • जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल तेव्हा एका ताटाला तूप लावून त्यावर ते एकसारखे पसरवा.
  • तयार केलेला शेंगदाणा बर्फीचे मिश्रण सेट होण्यासाठी किमान 5 ते 6 तास तसाच ठेवा.
  • शेंगदाणा बर्फीचे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यावर बदाम किंवा काजू बारीक पातळ काप टाका त्यानंतर मग बर्फीच्या आकारात कापून घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ किंमतीच्या जिओ प्लॅनमध्ये मिळवा 90 दिवसांची वैधता आणि 20GB अतिरिक्त डेटा
  • वन्यजीव संरक्षणासाठी नवे पर्व; वनतारा सुरू करणार जागतिक विद्यापीठ, अनंत अंबानींची घोषणा
  • डेटा कॉलिंग आणि SMS, जिओचा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन
  • IPL 2026 : फिन एलनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर केकेआरचा संताप, पण…
  • ‘राम’नावाचा जप करतच बघावा लागेल हा प्रचंड हॉरर चित्रपट, OTT वर करतोय ट्रेंड, घाबरट लोकांनी दूरच राहावे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in