• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कचऱ्यामध्ये सापडलेल्या मुलीला या सुपरस्टारने मारली मिठी, दिलं सुंदर नाव, आता सौंदर्यावरून नजर हटवणे कठीण

February 3, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Actor : बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती हे आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेल्या मिथुन यांनी पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पडद्यावर अ‍ॅक्शन आणि डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारे मिथुन प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच मोठ्या मनाचे असल्याचं त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगतो.

मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी योगिता बाली यांना चार मुलं आहेत. महाअक्षय (मिमोह), नमाशी, उष्मे आणि दिशानी चक्रवर्ती. मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की दिशानी ही मिथुन यांची मुलगी नसून ती दत्तक मुलगी आहे.

कचऱ्याजवळ सापडलेली दिशानी

दिशानीचा जन्म कोलकात्यात झाला होता. जन्मानंतर तिच्या पालकांनी तिला सोडून दिलं होतं. एका प्रसिद्ध बंगाली वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये एका नवजात मुलीला कचऱ्याजवळ एकटी सोडल्याची माहिती होती. काही स्थानिकांनी तिला पाहिलं आणि त्यातील एकाने त्या बाळाला सुरक्षित ठिकाणी नेलं. ही बातमी वाचताच मिथुन चक्रवर्ती अस्वस्थ झाले. दुसऱ्याच दिवशी ते त्या मुलीला भेटायला पोहोचले. त्या क्षणीच त्यांनी त्या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या कार्यात त्यांची पत्नी योगिता बाली यांनीही त्यांना पूर्ण साथ दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दोघांनी त्या बाळाला आपल्या घरी आणलं.

घरात आल्यानंतर त्यांनी त्या मुलीचं नाव ‘दिशानी’ ठेवलं. स्वतःच्या मुलीसारखंच तिला प्रेम, काळजी आणि सर्व सुखसोयी दिल्या. दिशानी ही कायम मिथुन यांची लाडकी राहिली असून आजही वडील–मुलीचं नातं अतिशय घट्ट असल्याचं पाहायला मिळतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dishani Chakraborty (@dishanichakraborty)

अभिनयाचं स्वप्न आणि परदेशात शिक्षण

वडिलांप्रमाणेच दिशानीलाही अभिनयाची आवड होती. भारतात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे गेली. तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून अभिनयाचे पदवी शिक्षण पूर्ण केलं. 2017 साली प्रदर्शित झालेल्या ‘गिफ्ट’ या शॉर्ट फिल्ममधून दिशानीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘होली स्मोक’, ‘अंडरपास’, ‘व्हाय डिड यू डू इट?’, ‘टू फेस्ड’ अशा अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये तिने काम केलं. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द गेस्ट’ या शॉर्ट फिल्ममधील तिच्या भूमिकेसाठी तिला विशेष प्रशंसा मिळाली.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : शनी ग्रहाची 3 राशींवर कृपा, बँक बॅलेन्स वाढणार, नशीब फळफळणार!
  • दिल्ली आणि गुजरातचं मिशन ‘फायनल’, एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांचा सारखाच निर्णय, नक्की काय?
  • Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल
  • 51 वर्षीय अभिनेत्रीचा साडीमध्ये बोल्ड लुक! सौंदर्य पाहून वेड लागेल, आता बोल्ड साडीमधील फोटोवर मोठं वक्तव्य
  • फेब्रुवारी महिन्यात मोगऱ्याच्या रोपाला कोणते खत द्यावे? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in