• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओंकार भोजने-शशांक शेंडे आमनेसामने; सरपंच-उपसरपंचांची रंगणार जुगलबंदी

March 12, 2026 by admin Leave a Comment


गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील बाचाबाची नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघं सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत. आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दोघांच्या संवादांमधील चुरस, एकमेकांवरची टोलेबाजी आणि गावातील राजकारणातून निर्माण होणारे प्रसंग कथेला वेगळीच रंगत देणार आहेत. येत्या 17 एप्रिलला ‘सालबर्डी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेविषयी बोलताना शशांक शेंडे म्हणाले, “‘सालबर्डी’ची कथा रहस्यमयी आहे. स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि एकमेकांसोबत असलेल्या नातेसंबंधांची झलक यामध्ये पाहता येईल. ही भूमिका करताना ओंकारसोबत झालेलं ट्युनिंग आणि आम्ही साकारलेली भूमिका पडद्द्यावर पाहणं  प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.” तर ओंकार भोजने म्हणाला, “उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूप रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांना ही जुगलबंदी नक्कीच आवडेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Onkar Bhojane (@onkar_bhojane_)

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पाहणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे, ओंकार भोजने यांच्यासोबत पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in