• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐश्वर्या राय हिचा तो एक सल्ला आणि अभिषेक बच्चन याची चांदीच चांदी, मोठा खुलासा..

February 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नाव कायमच चर्चेत असलेले आहे. ऐश्वर्या राय हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 2007 मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप घराण्याची सून ऐश्वर्या राय झाली. काही दिवस डेट करून ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी आहे. ऐश्वर्या राय कायमच आपल्या मुलीसोबत स्पॉट होताना दिसते. काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसली. यावर स्पष्टच बोलताना अभिषेक बच्चन दिसला. यासोबतच या चर्चांचा काही परिणाम होत नाही, असेही त्याने म्हटले. अभिषेक बच्चन याची अभिनयाप्रमाणेच व्यवसायात मोठी आवडत आहे. आपल्या अनेक मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना तो अनेकदा दिसला आहे. यादरम्यानच आता अभिषेक बच्चन याने मोठा खुलासा केला.

अभिषेक बच्चन त्याच्या गुंतवणूकीबद्दल बोलताना दिसला. कुठे कुठे आणि नेमकी कशी गुंतवणूक आपण केली हे अभिषेक बच्चन याने सांगितले. यादरम्यान त्याने ऐश्वर्या राय हिने त्याला नक्की काय सल्ला दिला, हे देखील सांगितले आहे. अभिषेक बच्चन म्हणाला की, मी सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. वडील अमिताभ बच्चन हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात, त्यांचा त्यावर विश्वास आहे. मी सोन्यातही गुंतवणूक केली.

ज्यावेळी मी सोन्यात गुंतवणूक करत होतो, त्यावेळी मला ऐश्वर्याने चांदीमध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. ऐश्वर्या राय हिच्या म्हणण्यावर अभिषेक बच्चन याने चांदीमध्ये गुंतवणूक केली. ऐश्वर्या राय हिचे ऐकणे अभिषेक बच्चन याच्याकरिता फायद्याचे ठरले आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावासोबतच चांदीचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहेत.

कोणीही विचारही केला नव्हता इतकी जास्त भरारी चांदीने घेतली आहे. नेमकी सोन्यात आणि चांदीत किती गुंतवणूक अभिषेक बच्चन याची आहे, याबद्दल काही माहिती ही मिळू शकली नाहीये. स्विगी आणि नागिन सॉस यामध्येही अभिषेक बच्चन याने मोठी गुंतवणूक केली, याबद्दल बोलताना तो काही दिवसांपूर्वीच दिसला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in