• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐश्वर्या रायने रक्त सांडलं… शाहरुख खान दारू प्यायला… माधुरी दीक्षितबद्दल तर नको त्या अफवा… कोणालाच माहिती नसलेलं मोठं रहस्य

February 4, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, गोंविदा, जॅकी श्रॉफ यांनी एक काळ बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील फिदा होते. तेव्हा 50 कोटींच्या बजेटमध्ये एक सिनेमा तयार झालेला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा व्यवसाय केला. त्या सिनेमाचं नाव आहे ‘देवदास’, आजही सिनेमाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सिनेमातील गाणी तर आजही लोकप्रिय आहेत. सिनेमासाठी प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतलेली. ऐश्वर्या हिने तर, स्वतःचं रक्त सांडलं होतं. तर माधुरीबद्दल अफवा पसरलेल्या होत्या… सिनेमा दरम्यान काय – काय झालं होतं हे फार कमी लोकांना माहिती आहे.

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ सिनेमासाठी अभिनेका शाहरुख खान पहिली निवड नव्हता. अभिनेता सलमान खान याला सिनेमासाठी ऑफर देण्यात आली. पण भाईजान सिनेमापासून दूरच राहिला. त्यानंतर सिनेमात अभिनेता शाहरुख खान याने देवदास या भूमिकेला न्याय दिला आणि ती भूमिका आजही चाहते विसरलेले नाहीत.

चुन्नी बाबू या भूमिकेसाठी सर्वांत आधी अभिनेता गोविंदा आणि सैफ अली खान यांना विचारण्यात आलं होतं. पण दोघांनी देखील भूमिकेसाठी नकार दिला. तेव्हा ही भूमिका साकारण्याची संधी जॅकी श्रॉफ याला मिळाली. तर अभिनेता मनोज बाजपेयी याला देखील चुन्नी बाबू या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण त्याने फक्त मुख्य भूमिका साकारणार अशी अट दिग्दर्शकांपुढे घातली.

देवदासच्या भूमिकेसाठी शाहरुख खानने खूप मेहनत घेतली. भूमिका प्रामाणिक दिसावी म्हणून त्याने थोडी दारूही प्यायली आणि धोतर घालून तासन्तास सराव केला. धोतर हाताळणे हा त्याच्यासाठी सर्वात कठीण भाग होता असं त्याने म्हटलं आहे.

दिग्दर्शक संजय लिला भंन्साळी यांनी सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. फक्त चंद्रमुखीच्या सेटसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात आला. तर पारो हिच्यासाठी 600 पेक्षा जास्त साड्या तयार करण्यात आल्या. असं सांगितलं जातं की, भंन्साळी यांनी सिनेमावर स्वतःचं सर्वकाही लावलं होतं… 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा व्यवसाय केला.

‘काहे छेड छेड मोहे’ या गाण्यात माधुरी दीक्षितने सुमारे 30 किलो वजनाचा लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये तिला नाचणं खूप कठीण होतं. ‘ढोला रे ढोला’ या सुपरहिट गाण्याला चित्रित करण्यासाठी 7 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला, ज्यामध्ये ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या.

सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, माधुरी दीक्षित गर्भवती असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु नंतर हे खोटं असल्याचं सिद्ध झालं. “ढोला रे” गाण्यात ऐश्वर्या रायने जड कानातले घातले होते. डान्स करताना ऐश्वर्या हिच्या कानातून रक्त येऊ लागलं होतं, पण तिने गाणं पूर्ण केलं…

श्रेया घोषाल ही तिचं पहिलंच गाणं बैरी पिया साठी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी पहिली आणि एकमेव गायिका आहे. सिनेमाता एक मोठा भाग मुंबईतील धारावी येथे चित्रित करण्यात आला होता, जिथे 20 व्या शतकातील जुना कोलकाता पुन्हा तयार करण्यात आलेला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्राची बॉस होती, निशिका आणि पाखी तर… अचानक तीन बहिणींनी आयुष्य संपवलं; त्या घटनेनंतर वडिलांचा धक्कादायक खुलासा काय?
  • ग्लूटेन फ्री डायट केल्यामुळे तुमच्या आरोग्याला नेमके काय फायदे होतात?
  • सनी लियोनी झाली ऊप्स मोमेंटची शिकार, शेजारी असणाऱ्या नवऱ्याने…, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
  • मीठाच्या पाण्यामध्ये हा एक पदार्थ मिसळा, डोक्यावरील तणावाचा डोंगर होईल कमी
  • ‘धुरंधर 2’मधील बडे साहब कोण? इंडस्ट्रीतल्या मोठ्या नावाची चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in