• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐश्वर्या रायच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट, सलमान खान म्हणालेला, ‘कुत्राही पाहणार नाही…’

March 12, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण आता दोघांच्या नात्याबद्दल नाही तर, सलमान खान याने ऐश्वर्या हिच्या एक सिनेमावर दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेता हृतिक रोशन याने मुख्य भूमिका साकारलेली, तर सिनेमाचं दिग्दर्शन संजय लिला भंन्साळी यांनी केलं होतं. सिनेमाची कथा इच्छामरणावर आधारलेली होती. सांगायचं झालं तर, एका ऐतिहासिक निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षांपासून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामरण मंजूर केलं आहे.

जवळजवळ 16 वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी या विषयावर एक सिनेमा बनवला होता, ज्याची  ने खिल्ली उडवली होती. आता 16 वर्षांनंतर सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे… 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुजारिश’ सिनेमाची कथा इच्छामरणाभोवती फिरत होती. पण सिनेमाकडे प्रेक्षकांना पाठ फिरवली…

असं देखील म्हटलं जाते की, सलमान खानने भन्साळींना क्रिस्टोफर नोलनचा प्रसिद्ध सिनेमा “द प्रेस्टीज” ची डीव्हीडी दाखवली. त्यानंतर भन्साळींनी “गुजारिश” बनवला. असंही म्हटले जाते की, सलमान स्वतः या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम करू इच्छित होता. पण, भन्साळींनी त्याऐवजी हृतिक रोशनला कास्ट केले. यामुळे सलमान नाराज झाला.

सिनेमात हृतिक याने जादूगराची भूमिका साकारलेली होती. जो एका घटनेमुळे लकवाग्रस्त होतो आणि हलचाल देखील करु शकत नव्हता… त्याला संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवरच घालवावं लागतं. परिणामी, तो न्यायालयात इच्छामरणाची मागणी करतो. हा सिनेमा इच्छामरण हा अधिकार असावा का? असा प्रश्न उपस्थित करतो.

सिनेमाची सलमान खानने उडवलेली खिल्ली…

सिनेमावर निशाणा साधत एका मुलाखतीत, सलमान खान म्हणालेला, ‘अरे… त्यामध्ये तर माशी उडत होती.. एक मच्छर देखील सिनेमा पाहायला गेला नाही … कोणता कुत्रा देखील सिनेमा पाहायला गेला नाही…’, असं सलमान खान म्हणालेला, सांगायचं झालं तर, सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा होती. दोघांच्या लग्नाच्या प्रतिक्षेत देखील  चाहते होते. पण नातं लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दोघांच्या नात्याचा अंत अत्यंत वाईट झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in