• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एलपीजी सिलेंडर की इंडक्शन, कशावर जेवण बनवल्याने वाचू शकतात तुमचे पैसे? जाणून घ्या गणित

March 13, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे. एलपीजीच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने महानगरांमध्ये इंडक्शन कुकटॉप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इंडक्शनचा साठा संपल्याची परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच आता एलपीजी सिलेंडर की इंडक्शन कशावर जेवण बनवल्याने तुमचे पैसे वाचू शकतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आज आपण याची माहिती जाणून घेणार आहोत.

विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर गॅस आणि इंडक्शनमध्ये मोठा फरक आहे. गॅसवर स्वयंपाक करताना निर्माण होणारी सुमारे ६० टक्के उष्णता हवेत वाया जाते. त्यामुळे यातील केवळ ४० टक्के उष्णता अन्नापर्यंत पोहोचते. तर इंडक्शन कुकटॉप हे उपकरण चुंबकीय क्षेत्रावर (Magnetic Field) कार्य करते. यात ९० टक्के ऊर्जा कार्यक्षमता मिळते. कारण यातील उष्णता केवळ थेट भांड्यात निर्माण होते.

खर्चाचे गणित काय?

सध्याच्या दरांचा विचार केला तर गॅस आणि वीज यांच्यातील आर्थिक फरकाद्वारे तुम्ही गणित मांडू शकता. सध्या दिल्लीत एलपीजीच्या १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरची किंमत सुमारे ९१३ रुपये आहे. इंडक्शनला एका सिलेंडरइतकी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अंदाजे ७८ युनिट वीज लागते. यासाठी ८ रुपये प्रति युनिट दराने खर्च होतो. याचाच अर्थ हा खर्च साधारण ६२४ रुपये इतका येतो. यानुसार जर तुम्ही इंडक्शन वापरल्यास दरमहा साधारण २८९ ते ३०० पर्यंत बचत होऊ शकते. ज्या राज्यांत वीज सवलती आहेत, तिथे हा फायदा अधिक असू शकतो.

सुरुवातीची गुंतवणूक आणि मर्यादा

इंडक्शन स्वस्त असले तरी त्यासाठी सुरुवातीला काही खर्च करावा लागतो. चांगल्या दर्जाचे इंडक्शन हे २००० ते ४००० रुपयांपर्यंत मिळते. यासाठी केवळ फ्लॅट-बॉटम असलेली स्टेनलेस स्टील किंवा कास्ट आयर्नची भांडी चालतात. जरी सुरुवातीचा खर्च जास्त वाटला, तरी महिन्याच्या बचतीतून एका वर्षात तो वसूल होतो.

व्यावसायिक क्षेत्रातील आव्हाने

घरासाठी इंडक्शन उत्तम असले तरी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी हा बदल मात्र कठीण असणार आहे. व्यावसायिक इंडक्शन यंत्रणा बसवण्यासाठी ३.५ लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. तसेच, वीज खंडित झाल्यास बॅकअपची समस्या आणि हाय-व्होल्टेज कनेक्शनची गरज यामुळे व्यावसायिक स्तरावर आजही एलपीजीलाच प्राधान्य दिले जात आहे. जर तुम्हाला महिन्याचा घरखर्च कमी करायचा असेल आणि स्वयंपाकघरातील उष्णता कमी करायची असेल, तर इंडक्शन हा एक स्मार्ट आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in