• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एपस्टीन फाईल्समुळे जगात खळबळ, पहिला राजीनामा पडला, ब्रिटीश राजकुमारावरही संकट

February 1, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून संपूर्ण जगात अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या फाईल्समुळे अनेकांची झोप उडाली आहे. आता या फाईल्समुळे स्लोवाकियाच्या एका वरिष्ठ नेत्याला राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच ब्रिटनचे माजी राजकुमार अँड्र्यू यांचीही चिंता वाढली आहे. या फाईल्समध्ये जगभरातील शक्तिशाली, श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी व्यक्तींचा एपस्टीन याच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एपस्टीन फाईल्समुळे राजीनामा

अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या फाईल्समध्ये नाव आल्यामुळे स्लोवाकियाच्या पंतप्रधानांनी मिरोस्लाव लाजॅक यांचा राजीनामा स्वीकारला आहे. लाजॅक संयुक्त राष्ट्र महासभेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कोणत्याही फौजदारी गुन्ह्याचा आरोप नाही, मात्र एपस्टाईन तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्या बैठकींशी संबंधित फोटो आणि ईमेल समोर आल्यानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या फाईल्समुळे माजी ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांच्यावरील दबाव वाढला आहे. कारण त्यांचाही एक आक्षेपार्ह फोटो समोर आला आहे. ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी याबाबत बोलताना म्हटले की, प्रिन्स अँड्र्यू यांना एपस्टाईनच्या कारवाया किंवा त्यांच्या नेटवर्कबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी अमेरिकन तपास संस्थांना सहकार्य करावे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

एपस्टीन फाईल्स समोर आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प म्हणाले की,’मी स्वतः फायली पाहिल्या नाहीत, परंतु विश्वसनीय सूत्रांनी मला सांगितले आहे की या फाईलींमुळे मी निर्दोष असल्याचे समोर आले आहे. कारण या फायली डाव्या विचारसरणीच्या गटांच्या अपेक्षांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत.”

फाईल्समध्ये कोणाची नावे आहेत?

एपस्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, न्यू यॉर्क जायंट्सचे सह-मालक स्टीव्ह टिश, अब्जाधीश बिल गेट्स, एलोन मस्क, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, माजी इस्रायली पंतप्रधान एहुद बराक, वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक आणि इतर अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे. यातून हे सिद्ध होत आहे की, एपस्टाईनची ओळख ही केवळ ट्रम्प यांच्याशीच नव्हे तर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशीही होती. आता आगामी काळात याबाबत अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in