
कल्याणमधील रायते पुलावर भीषण अपघात झाला आहे, या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एकाच कुटुंबातील 3 मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींपैकी अनेकजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Leave a Reply