• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका रात्रीचे 50 लाख रुपये…, ‘बिग बॉस’ स्पर्धकाकडे उद्योजकाची घाणेरडी डिमांड, धक्कादायक पुरावे समोर

April 9, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वातून कायम धक्कादायक सत्य समोर येत असतात. इंडस्ट्रीमध्ये तर आता कास्टिंग काऊच हा विषय सामान्य झाला आहे. पण यामुळेच अनेकांनी इंडस्ट्रीसोडण्याचा निर्णय घेतलं. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम करायची असले तर, तडजोड करावीच लागेल… अशी मागणी अभिनेत्रींकडे करण्यात येते… आता देखील असंच काही झालं आहे.. बिग बॉस स्पर्धकाकडे देखील एका उद्योजकाने घाणेरडी मागणी केली आहे. धक्कादायक खुलासा करणारी स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षीत आहे… गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. चंद्रिका हिने नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले.

पण आता चंद्रिका तिच्या नवऱ्यासोबत असलेल्या वादामुळे नाही, तिच्याकडे करण्यात आलेल्या घाणेरड्या मागणीबद्दल मोठा खुलासा केला आहे. चंद्रिका हिने सांगितल्यानुसार, तिला तडजोड करण्यास सांगण्यात आलं होतं… ज्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने मोठी रक्कम देण्याची ऑफर दिलेली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत चंद्रिका हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

चंद्रिका दीक्षित म्हणाली, ‘मी व्यवस्थित मेल पाहिलेला होता. एक चांगला आणि प्रसिद्ध उद्योजक होता. मी त्याचे स्क्रिनशॉट देखील देईल… त्याने मला रिसॉर्ट ऑफर केलं होतं. तो म्हणालेला, कंडिशन आणि सिचुएशन तुझी आणि जागा मात्र माझी… यासाठी चंद्रिका मी तुला 50 लाख रुपये ऑफर करतो. आता याबद्दल तू मला सांग…’

पुढे चंद्रिका म्हणाली, ‘मला ही ऑफर प्रोफेशनली ई-मेलच्या माध्यमातून आली होती…’ एवंढच नाही तर, याआधी देखील चंद्रिका हिला काही दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी देखील कॉल करून तडजोड करण्यास सांगितली होती… अनेकांनी तिला दुबईत देखील बोलावलं होतं…

चंद्रिका दीक्षितने पुढे स्पष्ट केले की, तिला पद ऑफर करणाऱ्या व्यक्तीने सल्ला दिला होता की, जर तिला पुढे जायचं असेल तर तिला तडजोड करावी लागेल. अन्यथा, ती तिच्या करिअरमध्ये प्रगती करू शकणार नाही. ‘वडा पाव गर्ल’ने पुढे सांगितले की, ही वस्तुस्थिती आहे.

चंद्रिका म्हणाते, ‘लोक म्हणतात, तुम्हाला असं पुढे होऊ देणार नाही… सत्य आहे… ब्रँड शूटसाठी असं करावं लागतं… लोक म्हणतात की, एकदा तरी तडजोड करावीच लागेल… म्हणतात पैसे सांग किती घेणार.. अडीच वर्षांच्या मुलीला सोडत नाही… तीन वर्षांच्या मुलीला सोडत नाही आणि तुम्ही माझ्याकडे बोट करताय…’ असं देखील चंद्रिका म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चंद्रिका हिची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in