• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली

February 2, 2026 by admin Leave a Comment


लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन बंगळुरुसाठी उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला सोमवारी ऑपरेशनमधून हटवण्यात आले आहे. एअर लाईनने दिलेल्या माहितीनुसार AI 132 उड्डाण घेणार होते. परंतू पायलटने सांगितले की प्लेन फ्युएल कंट्रोल स्विच इंजिन स्टार्ट करताना 2 वेळा पोझिशनने कटऑफ झाले. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले.

एअर इंडियाने सोमवारी सांगितले की त्यांनी त्यांच्या एका बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानात बिघाड झाल्याने ते रद्द केले. हे विमान उड्डाण घेत असताना पायलटने फ्युल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड झाल्याची माहिती एटीसीला दिली. विमान लंडन ते बंगलुरु असे प्रवास करणार होते. गेल्याच वर्षी याच स्विच (फ्यूल कंट्रोल स्विच)मध्ये बिघाड झाल्यानंतर अहमदाबाद येथे भीषण विमान दुर्घटना होऊन त्यात 260 लोक ठार झाले होते.

सुरक्षेसाठी फ्लाईट थांबिवली

एअर इंडियाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे की विमान (Al132) चे उड्डाणाची तयारी सुरु असताना पायलटला फ्युल कंट्रोल स्विच जागी थांबत नाहीत. वारंवार बंद ( ‘कट ऑफ’) होत असल्याचे आढळले. त्यामुळे सुरक्षेसाठी या विमानाचे उड्डाण तातडीने रोखण्यात आले.

DGCA ला दिली माहिती – एअर इंडिया

या गडबडीचा बातमी मिळताच त्या या विमानाला सेवेतून हटवून ग्राऊंडेट करण्यात आले. कंपनीने या विमानाची मूळ निर्माती कंपनीला तपास करण्यासाठी पाचारण केले आहे असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.  या संपूर्ण घटनेची माहिती डीजीसीएला देण्यात आली आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, एअर इंडियाने त्यांच्या सर्व बोईंग 787 विमानांचे स्विच तपासण्यात आले आहेत. मात्र त्यात कोणतेही दोष आढळले नाहीत. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि आहे आणि म्हणूनच, अगदी थोड्याशा संशयामुळेही ही तपासणी झाल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

पायलट असोसिएशनने पुन्हा प्रश्न उपस्थित केले

एअर इंडिया फ्लाइट एआय-171 अपघात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून,सर्व बोईंग 787 विमानांच्या विद्युत प्रणालींची सखोल तपासणी करण्याची मागणी आम्ही करत आहोत असे फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स असोसिएशन (एफआयपी) ने म्हटले आहे. आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालय (एमओसीए) आणि डीजीसीएला ईमेल आणि पत्रे लिहिली आहेत.एआय-161 अपघात इंधन नियंत्रण स्विच टीसीएमएमधील विद्युत बिघाडामुळे झालेला असू शकतो. बोईंग 787-8 विमानांमध्ये पाण्याची गळती होण्याची शक्यता असते, ज्यामुळे विमानाच्या मुख्य इलेक्ट्रॉनिक्स बेमध्ये पाणी शिरू शकते. यामुळे गंभीर विद्युत बिघाड होऊ शकतात असेही फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स असोसिएशन (एफआयपी) ने म्हटले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in