• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उलटफेर! श्रीलंका विजयासह सुपर 8 फेरीत, ऑस्ट्रेलियाचं आव्हान जवळपास संपुष्टात

February 16, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 30व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. दव फॅक्टर लक्षात घेऊन श्रीलंकेने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमवून 181 धावा केल्या. तसेच विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं.  श्रीलंकेने 8 गडी आणि 12 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. पाथुम निस्संकाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.  या विजयासह श्रीलंकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस नाही पण चमत्कारीक गणित असेल. पण त्यात झिम्बाब्वेला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत सर्वाधिक संधी आहे. झिम्बाब्वे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकला की सुपर 8 फेरीत जागा मिळवेल.

श्रीलंकेने विजयाचा पाठलाग करताना पहिलीच विकेट 8 धावांवर गमावली. कुसल परेरा फक्त 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 97 धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिस 51 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर पाथुमने पवन रत्नायकेसोबत खेळी पुढे नेली. या जोडीने हा खेळ संपवला.  पाथुम निस्संकाने 52 चेंडूत 100 धावा केल्या आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. यावेळी 10 चौकार आणि 5 षटकार मारले. पवन रत्नायकेने 15 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 104 धावांची भागीदारी केली. 8.3 षटकात इतक्या धावा गाठल्या होत्या. त्यामुळे 200 च्या पार धावा होतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. ही जोडी फुटली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. जोश इंग्लिसने 27 आणि ग्लेन मॅक्सवेलने 22 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी दुहेरी आकडा गाठू शकला नाही. कॅमरून ग्रीन 3, टिम डेविड 6, मार्कस स्टोइनिस 4, कूपर कोनोली 3, झेव्हियर बार्टलेट 0 आणि एडम झाम्पा 1 धाव करून बाद झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in