
उन्हाळा ऋतू सुरू होताच आपण प्रत्येकजण आपला आहार आणि कपड्यांमध्ये बदल करतोच, कारण या बदलामुळे आपले आरोग्य चांगले राहते. पण कधीकधी आपण यासर्व गोष्टींमध्ये आपल्या केसांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतो. यामुळे उन्हाळ्यात तुमचे केस निर्जीव दिसू लागतात. खरे तर तीव्र सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणे तुमच्या केसांचे नुकसानही करतात. यामुळे केस कोरडे आणि फ्रिजी होऊ शकतात. एवढेच नव्हे तर केस कमकुवत देखील होतात आणि तुटू लागतात. उन्हाळ्यात केसांच्या देखभालीशी संबंधित काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये हे एक महत्त्वाचे आहे.
कारण आपण उन्हाळ्यात जसे त्वचेवर सनस्क्रीन लावतो त्याच प्रमाणे केसांचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत फक्त काही सोप्या गोष्टींचे पालन करून तुम्ही उन्हाळ्यातही तुमचे केस निरोगी ठेवू शकता. चला तर मग उन्हाळ्यातील केसांच्या काळजीसाठीच्या या सविस्तर टिप्स जाणून घेऊयात.
केसांचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा
उन्हाळ्याच्या तीव्र उन्हामुळे केसांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून वाचवणे आवश्यक आहे. बाहेर जाताना डोके स्कार्फने झाकणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. कॅप आणि हॅट्स देखील खूप प्रभावी ठरतात. घराबाहेर असताना तुम्ही छत्रीचाही वापर करू शकता, ज्यामुळे तुमचे केस आणि त्वचा या दोन्हींचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होईल.
केसांना सुर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी प्रोटेक्टिव्ह लेअर तयार कर
उन्हामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केसांवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करणे महत्त्वाचे आहे. खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल लावणे फायदेशीर असले तरी त्यामुळे तुमचे केस खुपच तेलकट दिसू शकतात. यासाठी केसांना एक चांगले हेअर सीरम लावणे सर्वोत्तम आहे. यासाठी तुम्ही SPF असलेले सीरम किंवा हेअर स्प्रे वापरू शकता.
डीप कंडिशनिंग करा
तीव्र उष्णतेमुळे केस कोरडे होतात. तर हीच समस्या टाळण्यासाठी डीप कंडिशनिंगवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही हे दर 15 ते 20 दिवसांनी हेअर स्पाच्या मदतीने घरीच डीप कंडिशनिंग करू शकता. यासाठी स्पा क्रीम केसांवर व्यवस्थित लावा आणि ते सुकू द्या. त्यानंतर एक टॉवेल गरम पाण्यात बुडवा, पिळून घ्या आणि तो केसांभोवती दोन ते तीन वेळा गुंडाळा. यामुळे केसांना वाफ मिळते. यानंतर केस धुवा.
हीटिंग टूल्सचा वापर मर्यादित करा
उन्हाळ्यात वातावरणात आधीच जास्त आर्द्रता आणि तापमान असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांवर हीटिंग टूल्स उपकरणांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. केस निरोगी ठेवण्यासाठी, प्रत्येक ऋतूत ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग मशीन यांसारख्या नियमित हीटिंग टूल्सचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे.
हे काम आठवड्यातून एकदा करा
उन्हाळ्यात लोक अनेकदा केसांना तेल लावणे थांबवतात, पण या ऋतूतही केसांना आर्द्रतेची गरज असते. आठवड्यातून एकदा शॅम्पू करण्याच्या 1-2 तास आधी केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमच्या केसांचे पोषण होईल आणि ते मऊ राहतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply