• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यात भुक कमी लागतेय? ‘हा’ भाजलेला मसाला दह्यामध्ये करा मिक्स आणि पाहा आश्चर्यकारक फायदे

March 31, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यात भूक न लागणे, अपचन, पोट फुगणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशा वेळेस घरगुती उपाय म्हणून दह्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड मिक्स करून दही खाणे खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदात हे मिश्रण पचनासाठी रामबाण उपाय मानले जाते. चला तर मग दह्यासोबत भाजलेले जिऱ्याचे सेवन केल्याने कोणते फायदे आरोग्याला होतात ते जाणून घेऊयात.

जिऱ्याची पूड मिक्स करून दही खाण्याचे हे आहेत फायदे

शरीराला थंडावा देते: दही नैसर्गिकरित्या थंड असते आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध असते. त्यामुळे यात भाजलेले जिऱ्याची पूड मिक्स करून सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि गॅसपासून आराम मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. तसेच उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पोटाच्या बहुतेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

पोट निरोगी ठेवते: दही आणि जिरे उन्हाळ्यात महागड्या केमिकलयुक्त पेयांऐवजी हे नैसर्गिक दही-जिऱ्याचे सेवन केवळ पोट निरोगी ठेवण्यासच मदत करत नाही, तर तुम्हाला दिवसभर ताजेतवानेही ठेवते. यामुळे अपचन आणि गॅसपासून आराम मिळतो. भाजलेले जिरे पोटातील गॅस, पोट फुगणे आणि अपचन कमी करतात. दह्यात जिऱ्याची पूड मिक्स करून सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पचन सुलभ होते.

उन्हाळ्यात भूक वाढवते: दही आणि जिऱ्याची पूड हे मिश्रण एकत्र करून सेवन केल्याने भूक वाढवण्यास मदत करते. अनेकदा उन्हाळ्यात

आपली भूक मंदावते. भाजलेले जिरे भूक वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि दह्यासोबत त्यांचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो.

चयापचय वाढवते: जिऱ्यामुळे चयापचय वाढतो, ज्यामुळे कॅलरी वेगाने बर्न होतात आणि वजन नियंत्रणातही मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: दही आणि जिरे या दोन्हींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. जे उन्हाळ्यात कमकुवत होणारी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. तसेच सर्दी आणि छातीतील कफ टाळण्यास मदत करतात.

डिहायड्रेशन देखील दूर करते: दही शरीराला थंडावा देते, तर जिरे घामातून कमी झालेल्या खनिजांची भरपाई करतात, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या कमी होते.

दह्यामध्ये किती जिरे पूड मिक्स करावी?

एक चमचा भाजलेले जिरे चांगले वाटून घ्या. ते एक कप दह्यामध्ये मिक्स करा आणि चवीनुसार काळे मीठ देखील यात टाका. तुम्ही याचे सेवन नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणानंतर करू शकता. उन्हाळ्यात दिवसातून एकदा याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते हे मिश्रण केवळ पचनक्रियाच सुधारत नाही, तर उष्णतेमुळे होणारा थकवा आणि अशक्तपणा देखील दूर करते. तसेच ज्यांना जिऱ्याची ॲलर्जी आहे किंवा गंभीर आजार आहे, त्यांनी याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दम्याच्या रुग्णांनीही दही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…
  • Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
  • बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
  • काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in