• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यात बीटची ‘ही’ खास रेसिपी… चव अप्रतिम आणि आरोग्यास लाभदायक

March 8, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे बिलकूल लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात. कामाचा व्याप, कुटुंबाची जबाबदारी, ऑफिसमधील ताण… अशा सर्व गोष्टींमुळे आरोग्य मागे राहतं… म्हणून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बीटरुट फायदेशीर ठरेल…  जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बीटचा समावेश नक्कीच करायला हवा. तुमच्या रोजच्या आहारात बीट आणि गाजर खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते. पण अनेकांना हे बीट खाण्याची इच्छा होत नाही. पण जर तुम्हाला दररोज त्याच चवीचे बीट खायचे असेल तर कोणीही..

बरेच लोक हे बीट थेट खाणे टाळतात. पण जर तुम्ही दररोज त्याच चवीचे खाल्ले तर ते कोणालाही कंटाळवाणे वाटेल. पण त्यामध्ये थोडे बदल करुन खाल्ल्यानंतर तुम्हाला देखील बीट आवडू लागेल आणि  चव देखील चांगलीच येईलच, पण ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले राहील.

जर तुम्हाला थेट बीट खाण्याची इच्छा नसेल, तर एक मोठे बीट घ्या आणि ते प्रथम चांगले किसून घ्या. नंतर त्यात दही घाला आणि स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले मसाले घाला. बस्स…  बीट रायता तयार आहे.  तुम्ही ते नाश्त्यात खाऊ शकता किंवा जेवणात देखील समाविष्ट करू शकता.

अशाप्रकारे, दररोज आहारात बीटरूटचा समावेश करता येतो. शिवाय, बीटरूट आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार टाळता येतात. बीट रायता सर्व वयोगटातील लोक खाऊ शकतात. उन्हाळ्यात हा रायता खाणे अधिक फायदेशीर आहे. तुम्ही घरी बीट रायता देखील बनवू शकता.

अनेकांनी बीट ज्यूस देखील आवडत नाही. अशात तुम्ही बीटमध्ये थोडे आले आणि पाणी घालून बारीक करून रस काढून घ्या, त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि व्यवस्थित मिक्स करा… सांगायचं झालं तर, बीटला सुरपफूड म्हणून ओळखलं जातं… कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात.

उन्हाळ्यात बीटचं ज्यूस पिणे फायदेशीर ठरते… बीटरुटचा ज्यूय पिल्याने डिटॉक्स करते…. रक्तदाब नियंत्रीत राहते आणि उर्जेची पातळी वाढते… हिमोग्लोबिन वाढतो… त्वचा चमकदार होते एवढंच नाही तर, थकवा आणि अशक्तपणा दूर करतो…



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in