• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यात बटाट्यापासून ते केळीपर्यंत, या फळांच्या-भाज्यांच्या साली त्वचेच्या आरोग्यासाठी ठरतात उपयुक्त

March 10, 2026 by admin Leave a Comment


आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण आहारात हेल्दी पदार्थांचा व फळांचा समावेश करतो. अशातच जेव्हा आपण अशा काही फळांचे व भाज्यांचे सेवन करतो तेव्हा त्यांची साले निरुपयोगी समजून फेकून देतो. बटाटा, केळी, संत्रा किंवा काकडीची साले स्वयंपाकघरात अनेकदा निरुपयोगी मानली जातात. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की या काही फळांची व भाज्यांची सालं सालं स्किन केअर करिता अत्यंत प्रभावी ठरू शकतात. खरं तर फळं आणि भाज्यांच्या सालींमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक पोषक तत्वे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात जे त्वचेचे पोषण आणि सौंदर्य वाढविण्यास मदत करतात.

त्यातच बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्यातच काहीजण सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महागड्या स्किन केअर प्रोडक्टचा वापर करतात, परंतु कधीकधी या प्रोडक्टमधील कॅमिकल त्वचेला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे अनेकजण हे आता नैसर्गिक आणि घरगुती उपचार करण्यावर जास्त भर देतात. तर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारी फळं आणि भाज्यांची सालं ही सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या लेखात कोणत्या भाज्या आणि फळांच्या साली त्वचेच्या कोणत्या समस्या दूर करण्यास मदत करू शकतात ते जाणून घेऊयात.

बटाट्यांच्या सालांचा स्किन केअर करण्यासाठी असा करा वापर

बटाट्याच्या सालीचा वापर डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी-कॉम्प्लेक्स, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामध्ये नैसर्गिक कॅटेकोलेज एंझाइम देखील असते, जे डोळ्यांखालील काळी वर्तुळे हलकी करण्यास आणि सूज दूर करण्यास मदत करते. फक्त बटाट्याची साल घ्या आणि ती डोळ्यांभोवती हलक्या हाताने घासा.

केळीची साल देखील खूप उपयुक्त

केळीची सालं अनेकदा फेकून दिली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की ही सालं त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते. केळीच्या सालीचा पांढरा भाग तुमच्या चेहऱ्यावर 20 मिनिटे हलक्या हाताने घासून घ्या. केळीच्या सालीमध्ये असलेले एस्टेरिफाइड फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुरुमांशी लढतात आणि सूर्याच्या हानीकारक किरणांपासून झालेले त्वचेचं नुकसान नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यास देखील मदत करतात.

संत्र्याच्या सालीचा वापर

संत्र हे त्वचेसाठी वरदान आहेत. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्र्यांचे सेवन केल्याने त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहते. बरेच लोकं त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठीही या सालीचा वापर करतात. संत्र्याची साल वाळवून त्याची पावडर बनवा. ही पावडर मध, दही किंवा कोरफडीच्या जेलमध्ये मिक्स करून पेस्ट बनवा आणि फेस पॅक म्हणून वापरा. ​​संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन वाढवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते.

पपईची साल चेहऱ्याला देते त्वरित चमक

पपईची साल त्वचेला सुधारण्यास देखील मदत करते. सालीमध्ये नैसर्गिक पपेन एंझाइम असतात, जे मृत त्वचा काढून टाकण्यास आणि त्वरित चमक प्रदान करण्यास मदत करतात. फक्त पपईची साल तुमच्या त्वचेवर 10 मिनिटे घासून घ्या. तुम्ही हे आठवड्यातून तीन दिवस करू शकता आणि तुम्हाला काही दिवसातचं त्याचे परिणाम दिसतील.

कलिंगडाच्या सालीने चेहरा उजळवा

उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. कारण कलिंगडाच्या सेवनाने शरीराला थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का की कलिंगडाची साल चेहरा उजळवण्यास देखील मदत करते? सालाच्या आतील बाजूस चेहऱ्यावर घासल्याने लालसरपणा कमी होतो आणि त्वचा हायड्रेट राहते. खरं तर त्यात नैसर्गिक सिट्रुलीन अमीनो आम्ल असते, जे चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in