• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यात त्वचा ड्राय झालीय? ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब केल्याने तुम्हाला मिळेल मऊ त्वचा

March 26, 2026 by admin Leave a Comment


हिवाळा असो वा उन्हाळा कोणत्याही ऋतूत कोरडी त्वचा ही एक समस्या सतावत असते. हवामान बदलताच त्वचा कोरडी पडणे, पापुद्रे निघणे आणि खाज सुटणे या समस्या सुरू होतात. बदलत्या ऋतूंमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील कोरड्या आणि निर्जीव त्वचेमुळे तुम्हीही चिंतीत असाल तर आजच्या लेखात आपण असे काही प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, जे कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकतात. चला या घरगुती उपायांचा अवलंब कसा करावा तेही जाणून घेऊयात.

भोपळ्याच्या गराचा हायड्रेशन मास्क: भोपळ्याच्या बिया केवळ हृदयाचे आरोग्य, चांगली झोप आणि पचनासाठीच नव्हे, तर त्वचेला आर्द्रता देण्यासाठीही उत्कृष्ट मानले जाते. कारण यामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक फायबर असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. तर भोपळ्यापासून हा मास्क बनवण्यासाठी, दोन चमचे भोपळ्याच्या गरा घ्या. आता या गरात एक चमचा मध मिक्स करा आणि 15 मिनिटे लावून ठेवा. हा मास्क त्वचेवरील कोरडे डाग त्वरित कमी करतात आणि त्वचेला एक निरोगी चमक मिळते.

राईस जेली टोनर: राईसचे हे टोनर घरी बनवण्यासाठी, तांदूळ थोड्या पाण्यात उकळा आणि पाणी गाळून घ्या जेणेकरून त्या पाण्याला जेलीसारखा घट्टपणा येईल. पाणी थंड झाल्यावर हे घट्ट पाणी कॉटनच्या मदतीने पुर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल, कोरडेपणा कमी होईल आणि त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

पपई आणि मध : चेहऱ्यावर पपई आणि मधाचे मिश्रण लावल्याने कोरड्या त्वचेपासून आराम मिळू शकतो. पपईमधील ‘पेपेन’ नावाचे एन्झाइम त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, तर मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. हे मिश्रण तयार करण्यासाठी, दोन चमचे पिकलेली पपई आणि एक चमचा मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in