• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यात ओडिसामधील ‘या’ ठिकाणाला भेट देऊन अनुभवा शांती आणि निवांतपणाचा एक अनोखा संगम

April 2, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा सुरू होताच आपल्यापैकी अनेकजण अशी ठिकाणं शोधतात जिथे त्यांना कडक उन्हापासून आराम आणि शांतता अनुभवता येईल. अशातच तुम्ही जम्मू आणि काश्मीर सोडून इतर काही थंड हवेचे ठिकाणं शोधत असाल तर ओडिसामधील एक असे ठिकाण आहे जे काही लोकांना आजही माहित नाहीये. तर त्या ठिकाणांच नाव आहे डेरिंगबाडी. हे ठिकाणं ‘ओडिशाचे काश्मीर’ म्हणूनही ओळखले जाते. तर या ठिकाणाला भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

हिरवीगार वनराई, थंडगार वारा, मनमोहक धबधबे आणि शांत वातावरणाने वेढलेले डेरिंगबाडी हे निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे. येथील आल्हाददायक हवामान उन्हाळ्याच्या तीव्र उष्णते पासून दिलासा देते आणि शहराच्या धावपळीतून एक निवांत सुटका शांतता अनुभवायला मिळते. चला तर मग आजच्या लेखात आपण डेरिंगबाडीमध्ये तुम्ही कोणती ठिकाणं पाहू शकता याबद्दल जाणून घेऊयात.

डेरिंगबाडीचे वैशिष्ट्य काय आहे?

डेरिंगबाडी हे ओडिशाचे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे, जे ‘ओडिशाचे काश्मीर’ म्हणूनही ओळखले जाते. येथील थंड आणि आल्हाददायक हवामान हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे, जे उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतही दिलासा देते. घनदाट जंगले, पाइनची वने, कॉफीचे मळे आणि नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणाला अद्वितीय बनवतात. येथील शांत वातावरण आणि कमी गर्दीमुळे, निवांत सुट्टी घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात उत्तराखंड किंवा हिमाचलला जाण्याऐवजी तुम्ही येथे फिरण्याचा प्लॅप करू शकता.

डेरिंगबाडीमध्ये काय पाहावे

डेरिंगबाडीमध्ये भेट देण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. हिल व्ह्यू पॉइंटवरून मनमोहक सूर्यास्त आणि सूर्योदय पाहता येतो. मिदुबंदा आणि पुटुडी धबधबे देखील भेट देण्यासारखे आहेत. डोलुरी नदीचे शांत काठ आणि कॉफी गार्डन हे देखील फिरण्यासारखे आहेत. पाइनच्या जंगलातून फेरफटका मारणे हा एक खरोखरच अनोखा अनुभव देतो.

डेरिंगबाडी कशासाठी प्रसिद्ध आहे?

डेरिंगबाडी विशेषतः सेंद्रिय शेतीसाठी ओळखले जाते. येथील कॉफी, मिरी आणि हळद लोकप्रिय आहेत. शिवाय, येथील पाइनची जंगले आणि थंड हवामान यांमुळे हे एक अद्वितीय पर्यटन स्थळ बनले आहे. हिवाळ्यात येथे कधीकधी दव पडते, ज्यामुळे हे ठिकाण आणखी खास बनते.

डेरिंगबाडीला कसे जायचे?

डेरिंगबाडीपासून सर्वात जवळचे विमानतळ बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ (भुवनेश्वर) आहे, जे अंदाजे 250 किमी अंतरावर आहे. बेरहामपूर रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जिथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने डेरिंगबाडीला पोहोचू शकता. हे शहर भुवनेश्वर, फुलबनी आणि बेरहामपूरला रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे आणि वाटेतील सुंदर निसर्गदृश्य तुमचा प्रवास आणखी अविस्मरणीय बनवेल.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयावर विरजन, कर्णधार शुबमन गिलला बसला मोठा फटका
  • ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचे बाबा खलनायकानंतर बनणार सज्जन ‘पुरुषोत्तम’
  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in