• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उत्तम पचन, हाडंदेखील मजबूत राहावी यासाठी डाएटमध्ये फायबर-कॅल्शियमने समृद्ध ‘या’ फळांचा करा समावेश

April 2, 2026 by admin Leave a Comment


आपले आरोग्य तंदूरस्त राहावे यासाठी आहारात अनेक भाज्या आणि फळांचे सेवन करणे खुप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषण तत्त्वे मिळतात. अनेकजण त्यांच्या रोजच्या डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश करतात कारण सफरचंद हे एक असे फळ मानले जाते, ज्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे सफरचंद हे पचनक्रिया आणि हाडांसाठी फायदेशीर ठरते. पण याव्यतिरिक्त आपण आजच्या लेखात अशा पाच फळांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात सफरचंदांपेक्षा जास्त फायबर आहे आणि ती कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहेत. इतकेच नाही तर या फळांमधून सफरचंदांप्रमाणेच अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. योग्य प्रमाणात या फळांचा आहारात समावेश केल्यास तुमच्या सर्वांगीण आरोग्याला फायदा होतो.

भाज्या आणि कडधान्यांव्यतिरिक्त, आपण आपल्या आहारात फळे, बिया, सुकामेवा यांचाही समावेश केला पाहिजे. निरोगी जीवनासाठी आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक तत्वांची भरपाई करण्यास फळं मदत करतात. चला तर मग सफरचंदांपेक्षा जास्त फायबर, कॅल्शियम आणि अनेक खनिजे असलेल्या फळांबद्दल जाणून घेऊयात.

सफरचंदातील पोषक तत्वे

USDA नुसार 100 ग्रॅम सफरचंदात एकूण 2.4 ग्रॅम फायबर असतात. याव्यतिरिक्त त्यात 6 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. सफरचंद हे मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फ्लोराईड, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झियाझॅन्थिन यांचेही स्रोत आहेत.

फायबर आणि कॅल्शियमयुक्त फळे

नासपतीमध्ये फायबर भरपूर असते. फायबरच्या बाबतीत नासपती हे एक उत्तम फळ आहे. नासपती हे फळ बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते 100 ग्रॅम नाशपातीमध्ये 3.1 ग्रॅम फायबर आणि 9 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. तसेच ते लोह, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा देखील एक चांगला स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन सी सुद्धा चांगल्या प्रमाणात आढळते.

पॅशन फ्रूटमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते

पॅशन फ्रूट ज्याला कृष्णा फळ असेही म्हणतात. यामध्ये फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात सफरचंदांपेक्षा कित्येक पटींनी जास्त फायबर असते. USDA च्या आकडेवारीनुसार , 100 ग्रॅम पॅशन फ्रूटमधून 10.4 ग्रॅम फायबर आणि 12 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. त्यामुळे जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा तुमची हाडे मजबूत करायची असतील, तर तुमच्या आहारात पॅशन फ्रूटचा समावेश करा.

पेरूचे सेवन करा

पेरू हे फळ सुद्धा फायबरने भरपूर आहे. 100 ग्रॅम सफरचंदात 2.4 ग्रॅम फायबर असते, तर 100 ग्रॅम पेरूमध्ये 5.4 ग्रॅम फायबर आणि 18 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. इतकेच नाही, तर पेरूमध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यापेक्षाही जास्त प्रमाणात असते.

किवी फळ खा

किवी फळ आता बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाते, परंतु भारतात बहुतेक लोकं ते फक्त ताप आल्यावरच खातात. सध्या, तुम्ही हे फळ दररोज खाऊ शकता कारण त्यात अनेक पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतात. 100 ग्रॅम किवीमध्ये 3 ग्रॅम फायबर, 34 मिलिग्रॅम कॅल्शियम, 17 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 34 मिलिग्रॅम फॉस्फरस, 312 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 92.7 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते.

केळ्यात देखील फायबर भरपूर असते

पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात केळ्यांचा समावेश करण्याची शिफारस केली जाते. खरे तर पचनासाठी हे एक उत्तम फळ आहे. 100 ग्रॅम केळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यात 1.9 ग्रॅम प्रथिने, 2.6 ग्रॅम फायबर, 5 मिलिग्रॅम कॅल्शियम, 27 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 358 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 22 मिलिग्रॅम फॉस्फरस यांचा समावेश होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..
  • दैनंदिन जीवनात कापूराचे ‘हे’ आश्चर्यकारक उपयोग तुमच्या आरोग्यास ठरतील फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in