• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इस्लाम कुणाच्या मालकीचा नाही…, ओवैसी यांनी कुणाला फटकारलं? अल-अक्सा मशिदीवरही मोठं भाष्य

March 26, 2026 by admin Leave a Comment


‘टीव्ही 9 नेटवर्क’च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’चा आज (मंगळवार, 24 मार्च) दुसरा दिवस असून AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांना इस्लाम, आणि इराण येथे सुरु असलेल्या युद्धाचे भारतावर उमटणाऱ्या पडसादांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.. इस्लाम कुणाच्या मालकीचा नाही. त्यांच्या धर्माचा पॅलेस्टाईनशी घनिष्ठ संबंध आहेत. पॅलेस्टाईन येथे अल-अक्सा मशिदी असल्यामुळे  मुसमानांमध्ये भावना आहेत… ओवैसी म्हणाले, इराणमधील युद्ध सुरू झाल्यानंतर पाच दिवसांनी आम्ही शोक व्यक्त केला. सुरु असलेल्या युद्धामुळे भारताचं नुकसान होत आहे. यावेळी त्यांनी राज्य निवडणुका, गंगा विवाद आणि देशातील मुस्लिमांच्या दुर्दशेवरही चर्चा केली.

पॅलेस्टाईन येथे असलेल्या अल-अक्सा मशिदीवर ओवैसी म्हणाले, ‘इस्लाम कोणाच्या मालकीचा नाही… इस्लाम कोणत्या अरब देशाच्या मालकीचा नाही… इस्लाम एक धर्म आहे… जगण्याची एक पद्धत आहे… खरं सांगायचं झालं तर, पॅलेस्टाईनमधील अल अक्सा मशीद मुस्लिमांसाठी खूप खास आहे कारण ते इस्लाममधील तिसरे सर्वात महत्त्वाचे प्रार्थनास्थळ आहे. आमची अशी समज आहे की, मृत्यू झाल्यानंतर जेव्हा आमच्या कर्माचा हिशेब होतो, तेव्हा ज्याठिकाणी आम्हाला थांबवण्यात येतं, ते ठिकाण अल-अक्सा मशिद आहे…

इराण युद्धात भारताचं मोठं नुकसान – ओवैसी

ओवैसी म्हणाले, ‘ही जागा आमच्यासाठी खास आहे, कारण त्याठिकाणी आमच्या पैगंबर मोहम्मद यांनी त्यांचा प्रवास सुरु केलेला… तेथेच त्यानी अल्लाची भेट घेतली होती… ऑपरेशन सिंदूर दरम्यान अझरबैजानला आपण वाईट बोललो, आणि आता त्यांनाच विनंती करत आहेत की, आम्हाला जाऊ द्या… हे असं तुमचं धोरण आहे…

इराणमध्ये होत असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसत आहे… युद्ध अमेरिका आणि इस्रायलने सुरु केलं, पण नुकसान भारताचं होतं आहे. युरियाचा तुटवडा होता. गॅसचा तुटवडा होता. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला. जो स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा 11 वर्षांत तयार होणे अपेक्षित होते, तो तयार झाला नाही. असं देकील ओवैसी म्हणाले.

मनमानी नाही तर संविधानाने देश चालतो – ओवैसी

ओवैसी म्हणाली, ‘अमेरिकेचे डिप्टी सेक्रेटरी भारतात येऊन सांगतात की, आम्ही भारताला चीनप्रमाणे उदयास येऊ देणार नाही. असं म्हणणारे ते कोण आहेत… भारत त्यांचा देश आहे…? असं असताना देखील आपण काहीच बोलू शकलो नाही. आपण आता दिवसांची सवलत मागत आहोत जेणेकरून तेल खरेदी करता येईल. जेव्हा इराणसोबत संघर्ष सुरू झाला, तेव्हा त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करावे असे म्हटलं होतं… रशियाकडून तेल घ्या असं सांगणारे ते कोण आहेत? यावर कोणी काहीच बोलत नाही. इराण हल्ल्याच्या 5 दिवसांनंतर शोक व्यक्त करतो… आज आपण इराणला म्हणत आहोत, की आमची 2 – 3 जहाजं जाऊ द्या… पाकिस्तान, बांग्लादेश आणि चीन या देशांच्या जहाजांसाठी मार्ग मोकळा आहे… इराण आपल्याकडून तेलाच्या बदल्यात सामान घेऊन जात आहे… ‘

पुढे ओवैसी म्हणाले, ‘भारत सर्वांचा देश आहे.. सर्व धर्माचे लोक आणि वर्गातील लोक देशात राहत आहेत… आपला देश मनमानीने नाही तर, संविधानावर चालतो… सरकार राष्ट्रवादाला हिंदुत्वाच्या बरोबरीचे ठरवत आहे. भारतातील मुसलमान चंद्रावरून आलेले नाहीत. ते सुद्धा यात भूमिचा भाग आहेत, मुसलमान देखील देशभक्त आहेत… आज आमचं सरकार अमेरिकेकडे भीक मागत आहे, हा भारत आहे का? रशिया कडून तेल विकत घ्या असं सांगणारा अमेरिका कोण आहे…’ असं देखील ओवैसी म्हणाले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in