
Vikram Misri Visit America: सध्या इस्लामाबादमध्ये बळेबळेच शांतीवार्ता सुरू आहे. तर आखातात इराण, इस्त्रायल आणि अमेरिका एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. कधी पुन्हा युद्धाला तोंड फुटेल हे सांगता येत नाही. शांतीवार्तेची झुल पांघरून पाकिस्तान मिरवत आहे. तर या सर्व घडामोडींदरम्यान भारताने मोठी मुत्सदेगिरी दाखवली आहे. इस्लामाबादच्या बैठकी अगोदरच भारताने मोठा खेला केला. काय आहे ती मोठी अपडेट?
परराष्ट्र सचिव अमेरिकच्या दौऱ्यावर
इकडे इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेत शांतता करारवर चर्चा सुरू झाली आहे. याविषयीची बैठक सुरू होण्यापूर्वीच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात द्विपक्षीय संबंध, व्यापार, खनिजं, संरक्षण आणि क्वाड राष्ट संघटनेविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. एआय आणि खनिज संपत्तीसह आर्थिक आणि तांत्रिक देवाणघेवाणीवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली.
मार्को रुबियो भारत दौऱ्यावर
भारतीय परराष्ट्र सचिवांनी मार्को रुबियो यांची भेट घेतली. यात विविध विषयांवर आणि आगामी वाटाघाटीविषयी सकारात्मक चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेला या भेटीतून खूप आशा असल्याचे दोन्ही सचिवांनी मान्य केले. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी ही एक फलदायी बैठक झाल्याचे म्हटले आहे. गोर यांनी परदेशी सचिव रुबियो हे पुढील महिन्यात भारतात येण्याची शक्यता आहे. तर ट्रम्प यांनी सुद्धा याच वर्षी भारतात येण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे भारतासाठी हा दौरा खास राहण्याची शक्यता आहे.
दहशतवादासह दक्षिण आशियातील सुरक्षेवर चर्चा
या दौर्यात विक्रम मिसरी यांनी FBI चे संचालक काश पटेल यांच्यासह वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दरम्यान दहशतवादासह दक्षिण आशियातील सुरक्षेवर मोठी खलबतं झाली. भारतीय दुतावासाने दहशतवाद, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर भारतासह अमेरिकेच्या चिंतेबाबत लक्ष वेधले. तर या सर्वांवर कायद्याचा वचक ठेवण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. इस्लामाबाद शांततेची शेखी मिरवत असताना भारताने मोठा डाव टाकल्याचे मानले जात आहे.
Leave a Reply