• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय

April 9, 2026 by admin Leave a Comment


इराणसोबतचे युद्ध थांबल्यानंतर इस्रायलने लेबनानकडे मोर्चा वळवला होता. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये एका दिवसात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानसोबत थेट चर्चा सुरू करण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, बुधवारी इस्रायलच्या वायुदलाने देशभरातील 100 हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी हल्ले केले, ज्यात 203 लोकांचा मृत्यू झाला आणि 1000 हून अधिक जखमी झाले. त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेतन्याहू यांनी नेमकं काय म्हटलं?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाला लेबनानसोबत शक्य तितक्या लवकर थेट शांतता चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या चर्चांचा मुख्य मुद्दा लेबनानमध्ये असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे पूर्णपणे निशस्त्रीकरण करणे हे असणार आहे. नेतन्याहू म्हणाले की लेबनानकडून इस्रायलसोबत थेट चर्चेची वारंवार मागणी होत असल्याने मी तातडीने चर्चा सुरू करण्यास सांगितले आहे. हिजबुल्लाहचे निशस्त्रीकरण करणे आणि इस्रायल व लेबनान यांच्यात शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करणे हा आमचा मुख्य हेतू असेल.

लेबनानमध्ये 203 मृत्यू, 1000 जखमी

लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्य बेरुत आणि इतर भागांमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 203 लोकांचा मृत्यू झाला आणि 1000 हून अधिक जखमी झाले. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून गेल्या पाच आठवड्यांतील हा सर्वात मोठा मृत्यूंचा आकडा आहे. इस्रायलचे कोणतीही पूर्वसूचना न देता इमारतींवर हल्ले केले. यातील काही इमारती या घनदाट वस्ती असलेल्या व्यापारी आणि निवासी भागांमध्ये होत्या. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांनंतर लेबनानचे राष्ट्रपती जोसेफ औन यांनी या हल्ल्यांना क्रूर असे म्हटले. भीषण हल्ल्यांनंतर बेरुत आणि इतर भागांत बचाव पथके जिवंत लोक आणि मृतदेह शोधण्यात व्यस्त होती. बेरुतमधील मकसीद रुग्णालयाचे डॉ. वेल जारोश यांनी सांगितले की स्फोटानंतर 10 मिनिटांत सुमारे 70 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण उपचार घेत आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित
  • KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ
  • घरात कापूर जाळताना विसरूनही करू नका या 5 चुका; होईल मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in