• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इस्रायल, इराण युद्ध सुरू असतानाच भारताचा मास्टरस्ट्रोक, पाकिस्तानची उडाली झोप, मोठी खळबळ

March 6, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानची देखील चिंता वाढली आहे. नुकताच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर गंभीर आरोप केला होता, इस्रायल भारतासोबत मिळून मोठा प्लॅन तयार करत आहे. इस्त्रायला पाकिस्तानला कठपुतळी देश बनवायचं आहे. त्यानंतर आता भारतानं कॅनडासोबत असा एक करार केला आहे, या करारामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारतानं कॅनडासोबत युरोनियम सप्लाय संदर्भात एक मोठा करार केला आहे. या करारानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारताला अणु सहकार्याच्या क्षेत्रात विशेष सवलत मिळत असल्याचा आरोप या करारानंतर पाकिस्तानने केला आहे. याबाबत पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत आणि कॅनडामध्ये मोठा करार झाला आहे. भारताला अणु सहकार्याच्या क्षेत्रात विशेष सवलत मिळत असल्याचं हे एक उदाहारण असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

सोमवारी भारत आणि कॅनडामध्ये अनेक करार झाले. ज्यामध्ये रेअर अर्थ मिनरल्समध्ये सहकार्य आणि अणू ऊर्जेसाठी युरेनियमचा पुरवठा या दोन प्रमुख करारांचा समावेश आहे. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, नागरी अणुऊर्जा क्षेत्रात आम्ही दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे. दोन्ही देश लहान मॉड्यूलर आणि प्रगत अणुभट्ट्या तंत्रज्ञानावर एकत्र काम करतील.

मात्र यावर बोलताना पाकिस्तानने चिंता व्यक्त केली आहे. या करारावर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, कॅनडा आणि भारतामध्ये युरेनियम पुरवठ्याची एक मोठी आणि प्रदीर्घ काळासाठी डील झाली आहे. भारताला अणु सहकार्याच्या क्षेत्रात विशेष सवलत मिळत असल्याचं हे एक उदाहारण आहे. भारताला सूट देणं हे विडंबनात्मक आहे, कारण 1974 साली भारताने कॅनडाने पुरवठा केलेल्या युरेनियमचा वापर करून अणुचाचणी केली होती, मात्र तरी देखील भारताला विशेष सूट दिली जात असल्याचा आरोप पाकिस्तान कडून करण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in