• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इस्रायलने खामेनेई यांना नेमकं कसं मारलं? एक इशारा अन् खेळ खल्लास, Inside story

March 1, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून देखील खामेनेई यांच्या मृत्यू संदर्भातील वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये खामेनेई यांच्यासह संरक्षण दलातील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि खामेनेई यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा देखील मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खामेनेई यांची मुलगी, नात, जावई आणि सून यांचा समावेश आहे, दरम्यान इस्रायलने एवढी सुरक्षा व्यवस्था असताना देखील खामेनेई यांना नेमकं कसं मारलं? याबाबत आता प्रश्न उपस्थित होत असतानाच अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सीआयए ने ट्रॅक केलं खामेनेईचं लोकशन

द न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजंस एजन्सी (CIA) ने इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह अली खामेनेई यांचं लोकेशन ट्रॅक केलं. समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा खामेनेई असलेल्या ठिकाणावर हल्ला झाला तेव्हा ते आपल्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांसोबत एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये होते. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या ऑपरेशनशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयए गेल्या एक महिन्यांपासून खामेनेई यांच्या मागावर होते. गेल्या एक महिन्यामध्ये खामेनेईच्या प्रत्येक हालचालींचा मोठ्या बारकाईने सीआयएने अभ्यास केला होता, त्यानंतर खामेनेई यांचं लोकेशन ट्रॅक करून जिथे खामेईन होते, त्या घरावर हल्ला करण्यात आला.

सीआयएने दिली इस्रायला माहिती

सीआयएला माहिती मिळाली होती की, शनिवारी सकाळी सेंट्रल तेहरानमध्ये असलेल्या कंपाउंडमध्ये काही वरिष्ठ अति महत्त्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये खामेनेई देखील सहभागी होणार आहेत. त्यानंतर सीआयएने ही माहिती इस्रायलच्या अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देखील हे युद्ध अजूनही सुरूच आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in