• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण युद्धामुळे भारतात होणार इंधन आणि गॅसची टंचाई ? केंद्राचा प्लान बी काय ?

March 6, 2026 by admin Leave a Comment


इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाईत हल्ला केल्यानंतर जगभरातील इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. या युद्धाला सात दिवस झाले आहेत. या हल्ल्यानंतर होर्मुज स्ट्रेट सामुद्रधुनी बंद झाल्याने इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, वृत्तसंस्था एजन्सी एएनआयने सरकारी सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आमच्याकडे क्रुड इंधन, ऑईल प्रोडक्ट्स आणि एलपीजीच्या साठ्याची स्थिती चांगली आहे. ही होर्मुज स्ट्रेट्समध्ये अडकलेल्या एनर्जी सोर्सहून अधिक आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्त हल्ला केला. त्यानंतर इराणने इंधनाची वाहतूक करणाऱ्या होर्मुज स्ट्रेट सामुद्रधुनीवर बंदी आणली आहे. त्यामुळे भारतात इंधन आणि गॅसची टंचाई भेडसावणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता सरकारने प्लान बी काय आहे ते स्पष्ट केले आहे. सरकारकडे सध्या पुरेसा स्टॉक आहे. तसेच सरकारचा दुसऱ्या भागातून आपला पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणि होर्मुज स्ट्रेट्समधून पुरवठा कमी पूर्ण करण्यात येणार आहे.

रशिया पाठवत आहे इंधन

न्यूज एजन्सी एएनआयला सरकारी सूत्रांनी सांगितले की आम्ही २०२२ पासून रशियाकडून क्रुड ऑईल खरेदी करत आहे. २०२२ मध्ये आम्ही रशियाकडून एकूण आयातीच्या ०.२ पर्सेट आयात करीत होतो. फेब्रुवारीमध्ये आम्ही एकूण क्रुड ऑईल आयातीच्या २० टक्के रशियाकडून आयात केला. भारताने रशियाकडून प्रत्येक दिवशी १०४ दशलक्ष बॅरल आयात केली आहे.

MRPL रिफायनरी बंद झाल्याची बातमी चुकीची

MRPL रिफायनरी बंद झाल्याची बातमी चुकीची आहे. MRPL रिफायनरीत खूप चांगला स्टॉक आहे. सर्व एलपीजी रिफायनरींना एलपीजीचे प्रोडक्शन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या कडील एलपीजीचा स्टॉक चांगला प्रकारे आहे. आम्ही कंझम्प्शनचा मागणी कमी करण्यासाठी आपल्या पेटकेमचा वापर घरगुती वापरासाठी करु.

अमेरिकेकडून LPG ची आयात

जानेवारीपासून अमेरिकेकडून एलपीजी आयात सुरु झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय PSU तेल कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्ट साल २०२६ साठी युएस गल्फ कोस्टमधून सुमारे २.२ MTPA LPG आयात करण्यासाठीच्या कंत्राटावर सह्या केल्या आहेत.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in