• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण युद्धामुळे दुबईसोडून कुठे पळत आहेत जगातील अब्जाधीश ?

March 9, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेत इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशात हडकंप उडाला आहे. दुबईही श्रीमंत लोकांचे सेकंड होम होते. मात्र, आता दुबई देखील सुरक्षित राहीली नसल्याने दुबईतील श्रीमंत लोकांनी बस्तान उचलले आहे. फायनान्शियल टाईम्सच्या बातमीनुसार ओमानची राजधानी मस्कत येथून गडगंज श्रीमंत लोक पळून चालले आहेत. मस्कत येथून रोज सुमारे ३० चार्टर आणि प्रायव्हेट जेट उड्डाण घेत आहेत. प्रत्येक विमानात किमान आठ लोक आहेत. बहुतेक विमाने तुर्कीयेच्या इस्तंबुल आणि इजिप्तची राजधानी कैरो (Cairo) येथे जात आहेत. त्यानंतर येथून व्यावसायिक फ्लाईट पकडून लोक लंडन आणि इतर युरोपीयन देशात जात आहेत.

इराणच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत १००० श्रीमंत कुटुंबानी दुबई सोडली आहे. अरेबियन बिझनसच्या बातमीनुसार दुबईत सुमारे ८१,२०० अब्जाधीश रहातात. त्यामुळे तेथून होणारे पलायन मोठे मानले जात आहे. मस्कत आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अचानक प्रायव्हेट जेटची संख्या वाढली आहे. फ्लाईट रडार २४ च्या आकडेवारीनुसार गेल्या एका आठवड्यात तेथून उड्डाण घेणाऱ्या विमानात सुमारे एक तृतीयांश फ्लाईट चार्टर आणि खाजगी विमाने होती.

मस्कत एअरपोर्टची स्थिती काय ?

मस्कत विमानतळावर वाढलेल्या गर्दीमुळे एअरपोर्ट प्रशासनाने प्रायव्हेट जेट ऑपरेटरना अतिरिक्त उड्डाणे पाठवण्यास मना केले आहे. एअरपोर्ट प्रशासनाने ई-मेलद्वारे सांगितले की सध्या केवळ वेळापत्रकातील शेड्युल कमर्शियल फ्लाईटना प्राथमिकता दिली जाणार आहे. प्रशासनाने म्हटले आहे की जी फ्लाईट निश्चित शेड्युलमध्ये नाही त्याचे स्लॉट रद्द केले जातील.

मात्र, दुतावासांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या रिपॅट्रिएशन फ्लाईटना अनुमती दिली जाऊ शकते. परंतू यासाठी आधीच मंजूरी घेणे गरजेचे आहे. मस्कतहून येणाऱ्या प्रायव्हेट फ्लाईटपैकी एक सिटची किंमत २० हजार डॉलरहून जास्त आहे.अनेक श्रीमंत लोक आपल्या पाळीव प्राण्यांसह प्रवास करत आहेत. काही चार्टर कंपन्या सौदी अरबच्या रियाद आणि दम्मम एअरपोर्टचाही वापर करत आहेत.

हजारो प्रवासी एअरपोर्टवर अडकले

अजूनही अनेक प्रवासी वेगवेगळ्या जागी अडकून पडले आहेत. अनेक लोक आशियातून युरोपात जाण्यासाठी अमेरिकेच्या मार्गाने जात आहेत. न्यूयॉर्क, लंडन, फ्रँकफर्ट, पॅरिस, अॅमस्टरडॅम, झुरिच, कोलंबो आणि माले आदी साठी अतिरिक्त विमाने सोडण्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. दुबईने अलिकडेच काही उड्डाणांना सुरुवात केली होती. परंतू शनिवारी पुन्हा विमानतळाला थोडा वेळ बंद करावे लागले.

युएईचे जेट संरक्षण

दुबईतून उड्डाण घेणारी विमाने दक्षिणेकडे एका अरुंद एअर कॉरिडॉरवरुन उड्डाण आहेत. ज्यांची सुरक्षा युएईचे सैन्य जेट करत आहेत. या दरम्यान कतारने देखील आपली हवाई हद्द काही वेळासाठी उघडली होती, मात्र ती पुन्हा बंद केली आहे. ब्रिटीश एअरवेज, एअर फ्रान्स आणि व्हर्जिन एटलांटिक सारख्या अनेक युरोपिय एअरलाईन्सनी सुरक्षेच्या कारणास्तव आपली उड्डाणे रद्द वा डायव्हर्ट केली आहेत.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in