• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण युद्धात ब्रिटन पीएम स्टॉर्मर यांच्या निर्णयाने ट्रम्प संतापले, म्हणाले आधी कधी असे झाले नाही

March 2, 2026 by admin Leave a Comment


इराणच्या युद्धात अमेरिकेला त्याच्या जुन्या पार्टनरनेच दगा दिल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोंधळले आहेत. इराण आणि इस्राईल-US युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. आज इराणने अनेक मुस्लीम देशात हल्ले केले आहेत. या दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी एक असे वक्तव्य केले ज्याची अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी कधी केली नव्हती. ट्रम्प यांनी स्टॉर्मर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात यापूर्वी अशी गोष्ट कधी घडली नव्हती असेही ट्रम्प यांनी बोलून दाखवली आहे.

इराणच्या दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सहकारी ब्रिटीश पीएम कीर स्टॉर्मर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी डीएगो गार्सिया बेटाचा वापर अमेरिकेला विमानांसाठी करण्यास नकार दिला आहे. डिएगो गार्सिया हिंद महासागरातील एक बेट आहे. येथे ब्रिटनच्या सैन्याचा तळ आहे. ट्रम्प यांनी या तळाचा वापर इराण युद्धासाठी करण्याची परवानगी मागितली होती. परंतू त्यास ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नकार दिल्याने ट्रम्प यांनी स्पष्ट नकार दिल्याने ट्रम्प यांनी नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की ब्रिटनचे पीएम स्टॉर्मर यांना त्याच्या देशातील विरोधाची भिती सतावत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटीश वृत्तपत्र टेलिग्राफशी बोलताना सांगितले की ते कीर स्टॉर्मर यांच्यावर खूप नाराज आहेत. त्यांनी डिएगो गार्सियाचा इराणसाठी वापर करण्यासाठी नकार दिला आहे. एका खास मुलाखतीत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की ब्रिटनचे पीएम कीर स्टॉर्मर यांनी चागोस आयलँड बेसचा वापर करण्यासाठी अमेरिकन सैनिकांना रोखणे वेदनादायी आहे. ट्रम्प म्हणाले की आम्हा दोन देशात असे कधी झालेले नाही. असे वाटते की ब्रिटनचे पंतप्रधान याच्या वैधते संदर्भात नाराज असावे.

 मन बदलण्यास खूप जास्त वेळ घेतला

ब्रिटनने आंतरराष्ट्रीय कायद्याचा दाखला देताना गार्सिया आणि RAF फेअरफोर्ड सारख्या लष्करी तळांवरुन हल्ला करण्यासाठी अमेरिकेला परवानगी दिली नाही. मात्र, रविवारी रात्री पंतप्रधान राजी झाले आणि म्हणाले की खास आणि मर्यादित डिफेन्सिव्ह उद्देश्यांसाठी अमेरिकेला डिएगो गार्सियापर्यंत जाऊ देऊ. ट्रम्प यांनी यावर पंतप्रधान स्टॉर्मर यांनी त्यांचे मन बदलण्यास खूप जास्त वेळ घेतला. ट्रम्प म्हणाले की कदाचित आम्हा दोन देशांच्या दरम्यान असे आधी कधी झाले नसेल. असे वाटते की या संबंधीत वैधानिकतेबाबत ते नाराज होते.

डिएगो गार्सियावरील वादामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिटन पंतप्रधानांच्या वादग्रस्त चागोस कराराचा पाठिंबा काढून घेतला.यात हिंद महासागरच्या भागाची मालकी हक्क मॉरिशसला सोपणे आणि त्याऐवजी मिल्ट्री बेसला पुन्हा लीजवर देण्याचा करार होता.

आमचा देश युद्धात सामील नाही – कीर स्टॉर्मर

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी रविवारी सांगितले की त्यांचा देश युद्धात सामील नाही. त्यांनी एका व्हिडीओ संदेशात हे स्पष्ट केले आणि आखाती देशातील त्यांच्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in