• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण बेचिराख… 7000 ठिकाणी हल्ले, 100 जहाजे बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जगाची झोप उडाली

March 16, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर भीषण हल्ले करत आहे. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे. आतापर्यंत इराणमधील 7000 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यात लष्करी आणि व्यावसायिक ठिकाणांचा समावेश आहे अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच इराणची अनेक जहाजे बुडवली असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणच्या हल्लांमध्ये घट

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘इराणी शासनाकडून निर्माण झालेला धोका संपवण्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसांत आमची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू ठेवली आहे. आम्ही त्यांच्या सैन्यशक्तीला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. या हल्ल्यांमुळे इराणकडून होणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणांमध्ये 90% घट झाली आहे, तर ड्रोन हल्ल्यांमध्ये 95% घट झाली आहे. कारण अमेरिकेने इराणमधील मिसाइल आणि ड्रोन तयार करणाऱ्या कारखान्यांनाही लक्ष्य केले.’

नौदलाला मोठा फटका

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘गेल्या काही आठवड्यांत इराणच्या 100 पेक्षा जास्त नौदल जहाजांना बुडवले किंवा नष्ट केले गेले आहे.’ अमेरिकन सैन्याने इराणच्या महत्त्वाच्या खार्ग बेटावर मोठा हल्ला केला, जिथे सर्व लष्करी ठिकाणे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही खार्ग बेटावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. मात्र तेथील तेल पाइपलाईन आणि तेल पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य केले नाही.’

इराणवर भीषण हल्ल्याचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर होर्मुजच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांच्या वाहतुकीला अडथळा आणला गेला तर अमेरिका इराणच्या तेल पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्याचा विचार करू शकते. आम्हाला ते करायचे नाही, पण आम्ही ते करू शकतो. फक्त पाच मिनिटांत खात्मा होऊ शकतो, पण त्याची पुनर्बांधणी करायला खूप वेळ लागेल.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in