• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण-इस्राईल-USचे युद्ध आणि रशिया होतोय मालामाल, तिजोरीत रोज जमा होत आहेत ७१ अब्ज रुपये !

March 26, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि इस्राईल- अमेरिका दरम्यान यु्द्धाला आता महिना होत आला आहे. या युद्धाला २७ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धाने मध्य – पूर्व, युरोप आणि दक्षिण आशियातील संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. दुसरीकडे या युद्धाने रशिया मालामाल होत आहे.अमेरिकेने निर्बंध हटवल्याने रशिया मोठ्या प्रमाणात तेल विक्री करत आहे. तेल विक्रीतून रशिया प्रतिदिन किमान ७१ अब्ज रुपयांची कमाई करत आहे. गेल्या तीन वर्षात तेल विक्रीतून रशियाने बक्कळ कमाई केली आहे. कारण, युक्रेन युद्धामुळे साल २०२२ मध्ये अमेरिकेने रशियाच्या तेल विक्रीवर निर्बंध लावले होते. ते आता हटल्याने रशियाचा या इराण युद्धामुळे मोठा फायदा होत आहे.

‘द टेलिग्राफ ब्रिटेन’ च्या मते इराण युद्धामुळे रशिया मार्चमध्ये २४ अब्ज डॉलर तेलाची विक्री करणार आहे. प्रतिदिन हिशेबाने रशिया ७६० दशलक्ष डॉलर किंमतीचे तेल विकत आहे. ही आकडेवारी रुपयात ७१ अब्ज रुपयांच्या आसपास आहेत.

रशियाची कमाई कशी वाढली ?

1. इराणच्या युद्धामुळे होर्मुझ स्ट्रेट जवळपास बंद आहे. अटी आणि शर्थी लावून या मार्गाने जहाजे सोडली जात आहेत. ज्यामुळे आखाती देशातून तेलाची वाहतूक ठप्प झाली आहे. याच्यामुळे जगभरातील देश रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अमेरिकेने देखील अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली आहे.

2. युद्धाच्या आधीपर्यंत रशियावर तेल विक्री करताना अनेक देशांना सुट देत होता. मात्र आता रशिया तेल सध्याच्या बाजारभावाने विकत आहे. कीव्ह इन्स्टिट्यूटच्या मते रशिया प्रति बॅरल १०० डॉलरने तेल विकत आहे. त्यामुळे रशियाच्या कमाईत अचानक वाढ झाली आहे.

3. भारत आणि चीन सारख्या देशांनी रशियाकडून तेल खरेदीचे प्रमाण वाढवले आहे. आकडेवारीनुसार भारताने फेब्रुवारी २०२६ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये रशियाकडून ७२ टक्के जास्त तेल खरेदीचा निर्णय घेतला आहे.

युद्धात इराणची मदत करतोय रशिया

फायनान्शियल टाईम्सच्या मते युद्धात रशिया इराणची मदत करत आहे. रशिया इराणला अन्नसामुग्री शिवाय ड्रोन आणि हत्यार पाठवत आहे. पाश्चात्य गुप्तचरांच्या हवाल्याने छापलेल्या वृत्तानुसार रशिया इस्राईल आणि अमेरिकेच्या तळांची माहिती इराणला देत आहे.रशिया सॅटेलाईटव्दारे इराण या ठिकाणांची अचूक माहिती पुरवत आहे. याच माहितीच्या आधारे इराण अमेरिकन आणि इस्राईलच्या तळांना लक्ष्य करत आहे. रशियाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. इराणला आपणे केवळ काही औषधे पाठवल्याचे रशियाने म्हटले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in