• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण अमेरिका युद्धात सर्वात मोठे नुकसान युएईचे, हादरवणारे उपग्रह फोटो पुढे, थेट..

March 6, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला करत युद्धाला सुरूवात केली. आज अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा 7 वा दिवस आहे. इराणमधील परिस्थिती गंभीर आहे. मोठ्या शहरांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. सरकारी इमारतींवर हल्ले केले जात आहेत. या युद्धात आतापर्यंत इराणच्या दोन सर्वाेच्च नेत्यांना ठार करण्यात आले. इराणनने जवळपास 10 देशातील 13 अमेरिकन तळावर हल्ले केले. दुबईमधील अमेरिकन दूतावास कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या बाजूने या युद्धात अनेक देश आहेत. थेटपणे अमेरिकेचे समर्थन केले. मात्र, इराणच्या समर्थनार्थ एकही देश पुढे येत नाहीये. इराण गेल्या 6 दिवसांपासून एकटाच लढत आहे. तेहरानवर अत्यंत मोठे हल्ले अजूनही केले जात आहे. या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिका यांच्या निशाण्यावर तेहरान सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले.

मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे संयुक्त अरब अमिराती यूएई आणि जॉर्डनचे मोठे नुकसान झाले आहे. इराणने या देशांच्या रडार सिस्टीम नष्ट केल्या आहेत, ज्या अमेरिकेने बांधल्या होत्या या युद्धात फक्त इराण आणि इस्त्रायल यांचे नुकसान झाले नसून यूएईचेही नुकसान झाले. अनेक प्रमुख ठिकाणी इराणकडे क्षेपणास्त्र टाकण्यात आली.

इराण क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करत आहे. अमेरिकेने बनवलेले रडार काढून टाकून हवाई संरक्षण कमकुवत करत इराणकडून करण्यात आले, ज्यामुळे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले जास्त प्रमाणात होत आहे. अमेरिका-इस्रायली हल्ल्याच्या सुरुवातीच्या काळात इराणने जॉर्डनमधील अमेरिकन THAAD क्षेपणास्त्र बॅटरीच्या रडार सिस्टमवर हल्ला करण्यात आला, त्यानंतर थेट मोठे नुकसान झाले आणि ते नष्ट झाले.

अरब अमिरातीमध्येही इराणकडून अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला. दोन ठिकाणी अशाच प्रकार रडार सिस्टीम असलेल्या इमारतींवरही हल्ला करण्यात आला. मात्र, त्याठिकाणी स्टिटीमचे नुकसान होऊ शकले नाही. अमेरिकन दूतावास कार्यालयच नाही तर ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेची रडार स्टिटीम होती, अशाही ठिकाणी इराणकडून हल्ला करण्यात आला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in