• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत मोठा हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, थेट मोठा कट, काही क्षणातच..

March 13, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेक देश संकटात आहेत. इस्त्रायल, इराणपर्यंत हे युद्ध मर्यादित राहिले नसून अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. कच्चे तेल आणि गॅसची समस्या निर्माण झाली असून इराणवर घातक हल्ले अमेरिका आणि इस्त्रायलकडून केले जात आहेत. इराणच्या प्रमुख शहरांवर हल्ले केले जात आहेत. इराणकडून ज्या ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले करण्यात आले. फक्त लष्कर तळच नाही तर थेट अमेरिकन दूतावास कार्यालयांवरही हल्ले करण्यात आले. कायम सुरक्षित वाटणारे आखाती देश आता बॉम्ब हल्ल्याच्या दहशतीखाली आहेत. एलपीजी गॅससह कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाली असून जागतिक बाजारपेठेत या युद्धामुळे तेलाचे भाव अस्थिर आल्याचे बघायला मिळतंय. सतत तेलाचे भाव वाढत असल्याने संकट उभं राहिलं आहे.

अमेरिका इराणविरोधातील युद्धात थेट मैदानात उतरली असल्याने खळबळ उडाली. आता अमेरिकेकडून धक्कादायक बातमी पुढे येताना दिसत आहे. अमेरिकेतील मिशिगनमध्ये ज्यू समुदायाला लक्ष्य करून केलेला एक मोठा हल्ला उधळण्यात आला. गुरुवारी दुपारी डेट्रॉईटजवळील वेस्ट ब्लूमफील्ड येथील टेंपल इस्रायल सिनेगॉगमध्ये एका व्यक्तीने ट्रक घुसवला.

त्यानंतर या हल्ल्यानंतर थेट हल्लेखोराला गोळ्या झाडण्यात आल्या. अमेरिकन एजन्सींनी हा हिंसक मोठा हल्ला करण्याचे म्हटले आहे. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने संशयिताची ओळख पटवली असून त्याचे नाव आयमान मोहम्मद गजाली आहे. लेबनीजमध्ये जन्मलेला अमेरिकन नागरिक होता. 2011 मध्ये तो अमेरिकेत आला होता आणि 2016 पासून त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते.

सध्याच्या परिस्थितीला अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. यादरम्यान मोठा कट उधळून लावण्यात आला.  ही घटना गुरुवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास घडली. हल्लेखोराने ट्रक थेट सिनेगॉग इमारतीच्या दारात आणि एका गल्लीत नेला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच कारवाई केली. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोर गाडीतून बाहेर पडला आणि रायफल घेऊन आला. तो गोळीबार करणार तोच त्याला घेरणात आले आणि त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in