• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणसोबतच्या युद्धातून अमेरिका माघार घेण्याच्या तयारीत, तब्बल 6 देश विरोधात, थेट भूमिका घेऊनच…

March 7, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाला सुरूवात झाली, पण हे युद्ध नक्की किती दिवस चालेल याबाबत कोणालाही कल्पना नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच बोलताना म्हटले होते की, हे युद्ध पुढील चार ते पाच आठवडे सुरू राहिल. मात्र, सध्याची स्थिती बघता हे युद्ध अधिक काळ सुरू राहण्याचे संकेत आहेत. मात्र, युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली असतानाच अनेक देशात गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. तेल आणि गॅस पुरवठा अनेक भागात पूर्णपणे बंद आहे. खाडी देशात युद्ध भडकलेले असताना जगाला याचा परिणाम भोगावा लागत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा झळा भारतामध्येही बसत आहेत. एलपीजी घरगुती सिलेंडरची किंमत 60 रूपयांनी वाढली आहे. शिवाय गॅसचाही मोठा तुडवडा निर्माण झाला. यादरम्यानच आता अमेरिकेला धक्का देणारी बातमी पुढे आली.

28 जानेवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. यानंतर इराणने ज्या कोणत्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये मोठे हल्ले केले. ज्याचा फटका थेट खाडी देशांना मिळाला. आता अमेरिकेच्या विरोधात थेट खाडी देश भूमिका घेताना दिसत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला करण्यापूर्वी आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. त्यांनी आम्हाला कल्पना देणे अपेक्षित होते.

मुळात म्हणजे इस्त्रायलने काहीही कारण नसताना या युद्धात अमेरिकेला उतरवले. मात्र, या युद्धाचा फटका आम्हाला अधिक बसला. आता इराणचे हल्ले रोखण्यासाठी आमच्याकडे काहीच पर्याय नाहीत. जे काही होते, ते इराणकडून उद्ववस्थ करण्यात आले. शिवाय अमेरिका आमचे संरक्षण करू शकत नाही. आमच्यावर हल्ले होत आहेत. नुकसान होत आहे.

कुवेत, बहरीन, कतार, ओमान, संयुक्त अरब, साैदी अरेबिया यांनी याबाबत अमेरिकेकडून तक्रार केली पण त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. कतारमधील गॅस पुरवठ्यावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. ज्यामुळे कतारने मोठा निर्णय घेत पुढील काही दिवसांसाठी गॅस पुरवठा बंद केला. यासोबतच या वरील देशांमध्ये इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच जर युद्ध अधिक चालताना दिसले तर अमेरिका या युद्धातून माघार घेऊ शकते, असेही सांगितले जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in