• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणने तुर्कीवर डागले मिसाईल, पाकिस्तानची झाली हवा टाईट, गडबडीत सुरु केले हे ऑपरेशन

March 9, 2026 by admin Leave a Comment


इराणच्या विरुद्ध बलाढ्य अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. या युद्धात इराणने अमेरिकेचे मित्र असलेल्या मध्य पूर्वेतील अनेक अरब राष्ट्रांना टार्गेट केले आहे. आता इराणने तुर्कीवर देखील मिसाईल डागली आहेत. सोमवारी इराणने तुर्कीवर डागलेले मिसाईल भूमध्य सागरात नाटोच्या एअर आणि मिसाईल डिफेन्स सिस्टीमने नष्ट केले. तुर्कीला आता इराणने टार्गेट केल्याने त्याचा मित्र पाकिस्तान आता पुरता घाबरला आहे. पाकिस्तानने त्यांच्या शिपिंग आणि समुद्री व्यापाराला वाढता धोका पाहाता आता ऑपरेशन ‘मुहाफिजुल बह्र’ सुरु केले आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंग इंटर सर्व्हीसेस पब्लिक रिलेशनने (ISPR)  एक वक्तव्यात म्हटले आहे की पाकिस्तानचे नौदल राष्ट्रीय शिपिंग आणि समुद्री व्यापाराला प्रभावित करणाऱ्या धोक्याचा निपटारा करण्यासाठी हे ऑपरेशन सुरु करत आहे. हा निर्णय बदलत्या समुद्री सुरक्षा परिस्थिती आणि महत्वाच्या समुद्री मार्गांतील धोक्यांना ध्यानात घेऊन घेतला आहे.

ISPR च्या मते पाकिस्तानने ही मोहिम यासाठी सुरु केली आहे की देशाच्या इंधन पुरवठ्यात कोणताही अडथळा रोखला जाऊन समुद्र संचार मार्गांची सुरक्षा केली जाईल. पाकिस्तानचे नौदल सध्याच्या समुद्री स्थितीशी संपूर्णपणे अवगत असून जहाजांच्या वाहतूकीवर टेहळणी करत आहे. त्यांच्या संचलन योग्य प्रकारे व्हावे यासाठी हर प्रकारे नौदल प्रयत्न करणार असल्याचे पाकने म्हटले आहे.

तुर्कीवर हल्ल्याने पाकच्या चिंतेत वाढ

तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी इराणी बॅलेस्टीक मिसाईलच्या हल्ल्या संदर्भात माहिती दिली. मंत्रालयाने एक्सवर शेअर केलेल्या निवदेनात म्हटले आहे की मिसाईलला हवेत नष्ट केल्याने काही तुकडे दक्षिण तुर्की शहर गाजियांटेपच्या रिकाम्या भागात पडले. या घटनेत कोणी जखमी झाल्याचे वृ्त्त नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की तुर्की आपल्या शेजाऱ्याशी चांगले संबंध आणि क्षेत्रीय स्थिरतेला खूप महत्व देत आहे. देशाच्या सीमा आणि हवाई क्षेत्राला टार्गेट करणाऱ्या कोणत्याही धोक्याविरोधात सर्व आवश्यक पावले कोणत्याही हयगयी शिवाय उचलली जातील. तुर्की संरक्षण मंत्रालयाने इराणला अप्रत्यक्षपणे धमकी देताना म्हटले की तुर्कीचा इशारा मानने सर्व संबंधित पक्षाच्या हिताचे असेल.

अझरबैझानचा तुर्कीला पाठींबा

मिसाईलच्या घटनेनंतर तुर्कीचा जवळचा मित्र अझरबैझानने त्याला संपूर्ण पाठींबा दर्शवला आहे. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की या प्रकरणात आमचा देश तुर्की सोबत मजबूतीने उभा आहे. गेल्या बुधवारी तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते इराणने तुर्कीच्या दिशेने डागलेले एक मिसाईल नाटोच्या डिफेन्स सिस्टीमने पूर्व भूमध्य समुद्रात हवेत नष्ट केले.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in